Just another WordPress site

अडावद येथील ग्रामस्थांचे सार्वजनिक शौचालयासाठीचे उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे

डॉ सतीश भदाणे,पोलीस नायक

चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-

दि.२६ जानेवारी २४ शुक्रवार

तालुक्यातील अडावद येथील के.टी.नगर व माळी वाडा भागातील ग्रामस्थांची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून त्यांचे घरदेखील अत्यंत लहान आहेत.परिणामी परिस्थिती अभावी व जागेअभावी घरी संडास बांधकामाची व्यवस्था करू शकत नसल्याने सर्वाना ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक शौचालयात जावे लागते व त्याशिवाय दूसरा पर्याय त्यांच्याकडे नाही.सदरहू या भागातील ग्रामस्थ सुमारे ४० ते ४५ वर्षापासून सार्वजनिक शौचालयाचा उपभोग घेत होते परंतु सदरचे शौचालय जीर्ण झाल्यामुळे ग्रामपंचायतीने दोन शौचालयापैकी एक शौचालय पाडून त्याच जागी नवीन शौचालय बांधण्यास सुरुवात केली आहे.ग्रामपंचायतीने शौचालय पाडून एक महिन्याचा आत नवीन शौचालय बांधून सुरु करतो असे आश्वासन दिले होते परंतु गेली ३ ते ४ महिने झाले तरी देखील बांधकामबाबत कोणतेही प्रोग्रेस दिसत नाही त्यामुळे येथील नागरिकांचे शौचालयाच्या बाबतीत गैरसोय होऊन हाल होत आहेत.याबाबत अनेकवेळा तक्रारी करून देखील सदरील प्रश्न सोडविण्यात आलेला नाही.परिणामी आज दि.२६ जानेवारी शुक्रवार रोजी सर्व खालील सह्या करणारे व परिसरातील नागरिक यांच्या वतीने चोपडा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली असतांना बिडीओ वाघ यांनी उपोषणास्थळी भेट देऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर सदरील उपोषण मागे घेण्यात आले आहे.

सदरील उपोषणात हनुमंत महाजन,राकेश पाटील,गजेंद्र जैस्वाल,प्रकाश पाटील,पंकज भिमराव महाजन,शिवदास महाजन,पंढरीनाथ महाजन, ज्योती महाजन,अनिता महाजन,इंदुबाई महाजन,मंगलताई महाजन,शालुबाई महाजन,आशा महाजन,अन्नपुर्णा महाजन,वैजयंताबाई महाजन, मुरलीधर महाजन,सुरेश महाजन,रत्नाबाई महाजन,मालुबाई महाजन,ममता महाजन,रंजना महाजन,तन्वी महाजन,पदमाबाई महाजन, वैदीकाबाई महाजन यांच्यासह अडावद गावातील महिला पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.