मधुसूदन कोवे,पोलीस नायक
यवतमाळ-जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२७ जानेवारी २४ शनिवार
आष्टा येथील जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्ताने महापुरुषांचा सजीव देखावा सादर करून ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने संपूर्ण गावातून विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढून लेझीम संचलन,कबबुलबुल पथ संचलन,वारकरी रिंगण तसेच संत गाडगेबाबा, महात्मा गांधी,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेषभूषेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सजीव देखाव्याच्या माध्यमातून प्रभात फेरी काढण्यात आली.सदरील विविध कार्यक्रम व विद्यार्थ्यांनी साकारलेले सजीव देखावे हे गावकऱ्यांचे आकर्षक ठरले.या प्रभातफेरीत अमोल जुनगरे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,माजी अध्यक्ष मनोहर बोरवार,सोनूताई तोडासे सरपंच,सुनील पारीसे उपसरपंच,विशाल तोडासे, कोटमकर,तरुण मंडळी,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,महिला बचत गट सदस्य व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.प्रसंगी ध्वजारोहण अमोल जुनगरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी स्वागत गीत,प्रजासत्ताक दिनावर आधारित भाषण,वारकरी रिंगण, चक दे इंडिया या गीतावर लेझीम नृत्य सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उतम पवार यांनी केले.सूत्रसंचालन विरेंद्र सलाम यांनी तर आभार सुहासिनी खेरडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनिता ओंकार स.शि.व नितीन ढोबाळे विज्ञान शिक्षक,प्रभाकर रामगडे स.शि.यांनी परिश्रम घेतले.