यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२७ जानेवारी शनिवार
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपुर्ण देशाचे लक्ष वेधणारे ऐतिहासीक आंदोलन करणारे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनास यश मिळाल्याबद्दल यावल तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने येथील भुसावळ टी पॉईंट वर फटाके फोडून तसेच पेढे आणि लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी ‘समाज का नेता कैसा हो मनोज जलांगे जैसा हो !’ ‘एक मराठा लाख मराठा !’ ‘तुमचं आमचं नातं काय -जय जिजाऊ- जय शिवराय,’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.प्रसंगी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी मनोज जरांगे यांचे गेल्या सहा महिन्यापासून सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळाल्याचे सांगून मराठा समाजाच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित मागणीला न्याय मिळाल्याची त्यांनी सांगितले व यामुळे भविष्यात समाजाच्या पुढील पिढीला शैक्षणिक व नोकरी विषयक आरक्षणाचा लाभ मिळू शकेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील,जिल्हा बँकेचे संचालक विनोदकुमार पाटील,माजी उपनगराध्यक्षप्रा.मुकेश येवले,बापू जासूद,डी.बी. पाटील,डॉ.हेमंत येवले,शशिकांत पाटील,धनराज पाटील,एकनाथ शिरोळे,सुनील गावडे,नरेंद्र भैय्यासाहेब पाटील,दलू मानकर,बंटी भोसले, निलेश पवार,दिनकर क्षीरसागर,देवकांत पाटील,अजय पाटील,अतुल भोसले,अतुल यादव,निलेश पवार,प्रकाश पवार,गुणवंत पवार,पंकज पवार,अनिकेत येवले,निशिकांत पवार,प्रदीप पाटील,गोपाल पाटील,अजय पवार,गजानन भोसले,अशोक पाटील,प्रा.संजय पाटील,जयेश कदम, दर्शन येवले,विलास येवले,यश येवले,तुषार येवले,विनोद येवले,विकी चव्हाण,वंश येवले,हर्षल यादव,किशोर यादव,गणेश कोल्हे,पप्पू मोहिते, चेतन भोईटे,विशाल शिर्के,गणेश भोईटे,गौरव पाटील,आयुष यादव,मनोज येवले,आदित्य येवले,स्वप्निल बोरसे,भिकन महाजन,गोपाल कोलते संतोष पाटील,भास्कर पाटील यांच्यासह समाजबांधव मोठया संख्येने या आनंदोत्सवात सहभागी झाले होते.