Just another WordPress site

“हे सगळे करून ओबीसींवर अन्याय केला आहे की मराठ्यांना फसवले जात आहे?”

शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर देत छगन भुजबळ यांचा सवाल

छगन भुजबळ म्हणाले,आत्ता तुम्ही घाईघाईने जे काही केले आहे ते अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय जातींनाही लागू आहे त्यामुळे मला दलित सामजाच्या नेत्यांना,आदिवासी नेत्यांना विचारायचे आहे की याचे पुढे काय होणार? असेच एक भांडण आधीपासून चालू आहे.खोटी प्रमाणपत्र घेऊन आदिवासी समाजातील लोकांच्या नोकऱ्या घेतल्याच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने कारवाईचे निर्देश दिले आहेत परंतु तो प्रश्न अद्याप सोडवता आलेला नाही त्यामुळे सगेसोयऱ्यांचा नियम आदिवासी आणि दलितांनाही लागू होणार का? असा प्रश्न सर्वाना पडला आहे.अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणाले,सगेसोयऱ्यांबाबतच्या निर्णयाने सर्वच जाती सर्वांसाठीच खुल्या झाल्या आहेत.कोणीही या,एक शपथपत्र द्या आणि लगेच जात बदलणार? मला एक गोष्ट समजली नाही की,हे सगळे करून ओबीसींवर अन्याय केला आहे की मराठ्यांना फसवले जात आहे याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.