यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२७ जानेवारी २४ शनिवार
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथील हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा आज दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तक गाव चितोडे येथे पार पडला.प्रसंगी
सकाळच्या सत्रात श्रमदान करताना विद्यार्थी स्वयंसेवकांच्या वतीने गावातून स्वच्छता अभियान संदर्भात जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी स्मशानभूमीची स्वच्छता करून मेन रोड,ग्रामपंचायत परिसर व तसेच गावातील स्मशान भूमीतील बगीच्यातील झाडांची स्वच्छता करण्यात आली.
प्रसंगी दुपारच्या बौद्धिक सत्रात प्रमुख वक्ते डॉ.नरेंद्र महाले यांनी सक्षम युवा व समर्थ भारत या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतांना मोठी स्वप्न पाहिले पाहिजे तसेच आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.ग्रामीण भागात अडचणीवर मात करणारे विद्यार्थी जीवनात परिवर्तन घडवून आणतात त्यासाठी साथ देणारी माणसही लागतात.अचूक निरीक्षण क्षमता,आदर्श संस्कृती, जीवनमुल्ये आदी विकसित झाले पाहिजे अशी अपेक्षा डॉ.महाले यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षा कु.दिक्षा पंडित हिने सांगितले की, आजच्या तरूण पिढीने गुणवत्ता आणि व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कु.चारुशीला टोंगे हिने केले तर कु.टिनू पाटील याने आभार मानले.यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.डी. पवार,महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.वैशाली कोष्टी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.सुभाष कामडी,प्रा.मिलिंद मोरे,अमृत पाटील, वेदांत माळी,मनोज बारेला यांनी परिश्रम घेतले.