Just another WordPress site

यावल पटेल इंग्लीश स्कुलमध्ये महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२८ जानेवारी २४ रविवार

येथील श्री मनुदेवी आदिवासी विद्या प्रसारक मंडळ संचलीत सरदार वल्लभभाई पटेल स्कूलमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सारिका पाटील पोलीस कर्मचारी यावल,निर्मला महाजन,मंगला फेगडे तसेच सरस्वती विद्यामंदिर शाळेचे उपशिक्षक नरेंद्र महाले इत्यादी उपस्थित होते.प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका शिला तायडे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी नरेंद्र महाले यांनी मुलगी व आई या नात्यावर अत्यंत सुंदर असे भाषण करून सर्व महिला वर्गांना सुंदर अशी मार्गदर्शनपर माहिती दिली.त्यानंतर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.हळदी कुंकवामध्ये महिला वर्गांचे उखाणे तसेच विविध स्पर्धा घेण्यात आल्या तसेच वाण देण्यात आले. राजेंद्र महाजन व निर्मला महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशांत फेगडे व सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टिना निंबाळे तसेच कुंदा नारखेडे व अर्चना चौधरी यांनी केले.प्रसंगी विद्यार्थी,विद्यार्थिनी,शिक्षक,शिक्षकेतर प्रतिनिधी व महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.