Just another WordPress site

“छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या महाराष्‍ट्रात लढवय्येपणाचा वारसा आणि इतिहास असलेल्‍या मराठा समाजाचे खच्‍चीकरण होणार नाही याची काळजी घ्‍यावी”

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मराठा आरक्षणावरून सरकारला महत्त्वाचे आवाहन

मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने केलेल्या मागण्यांवर राज्य सरकारने अधिसूचना काढली आहे.या अधिसूचनेनंतर ओबीसी समाजातील नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.या अधिसूचनेतील तरतुदींनुसार ओबीसी समाजावर अन्याय होणार असल्याचे ओबीसी नेत्यांनी म्हटले आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे या पक्षातील दोन्ही नेत्यांनीही सरकारच्या या निर्णयाविरोधात आक्षेप नोंदवला. आता याच विषयावर आपले म्हणणे मांडण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकार परिषद घेणार होते मात्र त्यांनी ही पत्रकार परिषद रद्द केली आहे.छगन भुजबळ यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात ओबीसी नेत्यांची बैठक आपल्या निवासस्थानी बोलविली होती.या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या अध्यादेशाचा विरोध केला तसेच आगामी काळात आंदोलनाची दिशा कशी असेल याबाबत भूमिका मांडली.१ फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात सर्व आमदार,खासदार आणि तहसीलदार यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने एकत्र येऊन ओबीसी समाजाने आंदोलन करावे असे आवाहनही छगन भुजबळ यांनी केले आहे.त्याचबरोबर मराठवाड्यातून सुरुवात करत संपूर्ण राज्यात ओबीसींची एल्गार यात्रा काढली जाणार आहे अशी माहिती देखील छगन भुजबळ यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.