चोपडा शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर लाखोंच्या गुटख्यासह आयसर जप्त ; चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधि) :-
दि.३० जानेवारी २४ मंगळवार
विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी परिक्षेत्रातील अवैध धंदे यांचे उच्चांटन करण्यासाठी नेमणुक केलेल्या पथकाने काल दि.२९ रोजी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी गुप्त माहिती वरून आयसर गाडीची झाडाझडती घेतली असता लाखों रुपयांचा गुटखा सापडला असून याबाबत रात्री उशिरापर्यंत चोपडा शहर पोलीस स्टेशला गुन्हा नोंदचे काम सुरू होते.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,शहरापासून अकुलखेडा शिवारातील चावरा इंटरनॅशनल स्कुलजवळ हिंगोणा गावाकडून चोपडा शहराकडे येणारे आरोपी कल्पेश अशोक साळुंखे वय २६ वर्षे रा.सिंधी गाव ता.भडगाव जि.जळगाव (आयशर क्र.MH १९ CY ६९७२ वरील चालक),ललीत माधव जाधव वय.२६ वर्षे रा.दादावाडी ता.जि.जळगाव,अमोल युवराज पाटील वय.२१ वर्षे रा.तुराटखेडा ता. पारोळा जि.जळगाव यांनी संगनमताने प्रतिबंधित साठ्याचे ट्रान्सपोर्ट मालक,वाहन मालक व गुटख्याचे साठ्याचा मालक,भुषण उमेश पवार रा. तुराटखेडा,ता.पारोळा जि.जळगाव पुर्ण नाव पत्ता माहित नाही,पंकज राठोड रा.जळगाव पुर्ण नाव पत्ता माहित नाही,अरुण पाटील रा.जळगाव पूर्ण नाव पत्ता माहित नाही यांचे सांगण्यावरुन संगनमत करुन महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असल्याचे माहिती असुन देखील सदर पान मसाला व सुंगधित तंबाखु,सुपारी या असुरक्षित,आरोग्यास घातक,अपायकारक व प्रतिबंधीत अन्न पदार्थ असलेला विमल पानमसाला,व्हि.१ तंबाखु, सागर पान मसाला,राज निवास पान मसाला कब्जात बाळगुन अवैधरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता खरखोन मध्यप्रदेश येथील अनोळखी व्यापारी नाव पत्ता माहित नाही यांचे सांगणेवरुन त्याचे हस्तक नामे निखील रा.खरघोन मध्यप्रदेश पुर्ण नाव पत्ता माहित नाही,दिपक रा.खरघोन मध्यप्रदेश पुर्ण नाव पत्ता माहित नाही यांच्याकडुन खरेदी करुन तो आयशर क्र.MH १९ CY-६९७२ या वाहनामध्ये भरुन वाहतुक करतांना एकुण ५९,४६,३०४ रु.किमतीच्या मुद्देमालासह मिळुन आले आहे.याबाबत चोपडा शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं.-२०२४ भा.द.वि.कलम ३२८,२७२,२७३,१८८,१०९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई डॉ.बी.जी.शेखर,मा.विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार हे करीत आहे.