यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३० जानेवारी २४ मंगळवार
येथील श्रीमनुदेवी आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश स्कूलमध्ये स्नेहसंमेलन कार्यक्रमात फन फेअर कार्यक्रम सादर करून मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ईश्वर कोळी तलाठी शहर यावल,सुरज जाधव महसूल विभाग यावल,आरती धनगर व राजेंद्र महाजन चेअरमन सरदार वल्लभभाई पटेल स्कूल,शाळा सदस्य शशिकांत फेगडे व मिलिंद भालेराव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपास्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.तद्ननंतर शशिकांत फेगडे व शाळेच्या मुख्याध्यापिका शिला तायडे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे शाल,श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.प्रसंगी शाळेच्या सर्वच विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेऊन उत्कृष्ट असे खाद्यपदार्थ बनवून आणले होते व अत्यंत छान प्रकारे टेबल (स्टॉल) सुद्धा सजवण्यात आले होते.यावेळी सर्व प्रमुख अतिथींनी या प्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सर्व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत सर्व विद्यार्थ्यांच्या कलाकुशलतेचे कौतुक केले.दरम्यान या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांचे कलाकौशल्य तसेच व्यवहार चातुर्य दिसून आले.विद्यार्थी खाद्यपदार्थ विकताना अत्यंत उत्साहित होऊन आपले कौशल्य सादर करत होते.या कार्यक्रमास सर्व पालक वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.सर्व पालकांनी सर्व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आजचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व आनंदात पार पाडण्यास सहकार्य केले.राजेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशांत फेगडे सर व सर्व शिक्षकवर्ग व कर्मचारीवर्ग यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टिना निंबाळे व जागृती चौधरी यांनी केले.