Just another WordPress site

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांची लक्षणीय हजेरी

साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर

दि.१ फेब्रुवारी २४ गुरुवार

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास अमळनेर येथे काल दि.२ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे.या पार्श्वभूमीवर संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रम २९ जानेवारीपासून आयोजित करण्यात आले होते व याचा ३१ जानेवारी रोजी समारोप करण्यात आला.पूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांस आर्या शेंदुर्णीकर (जळगाव) यांनी कथ्थक नृत्याने बहारदार सुरुवात केली.साहित्य संमेलनात संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांची लक्षणीय हजेरी होती.जळगावच्या तेजल जगताप याने एकल तबला वादन सादर केले.सुनील वाघ व सहकाऱ्यांनी ‌‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा कार्यक्रम सादर केला.दुसऱ्या दिवशी ३० रोजी ‌‘आमची माणसं आमची संस्कृती’ हा कार्यक्रम नयना कुळकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केला.अमळनेर महिला मंचतर्फे ‌‘सूर तेच छेडीता’ हा कार्यक्रम सादर केला.गुरुवर्य श्री बालचंद्र गुरुजी (केरळ) यांचा शिष्य परिवार कानुश्री संगीत विद्यालय धुळे यांनी सादर केलेल्या भरतनाट्यमने सर्वांना मंत्रमुग्ध केले.

समारोपाला भरतनाट्यम्‌‍चे उत्कृष्ट सादरीकरण-कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी काल ३१ जानेवारी रोजी गुरू सौ.नेहा जोशी यांचा शिष्य परिवार मुद्रा स्कूल ऑफ भरतनाट्यम जळगावच्या विद्यार्थिनींनी भरतनाट्यम्‌‍चे उत्कृष्ट असे सादरीकरण केले.‌‘अशी पाखरे येती’ने सांगता
जळगावच्या यज्ञेश जेऊरकरने एकल तबला वादन सादर केले.संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची सांगता ‌‘अशी पाखरे येती’ कार्यक्रमात अमळनेर स्वरांजलीचे किशोर देशपांडे व सहकाऱ्यांनी केली.गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या साहित्य संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना अमळनेर शहरासह परिसरातील कलाप्रेमी तसेच साहित्य रसिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.