थोरगव्हाण येथील महिलांचा दारु विक्रेत्याच्या घरावर मोर्चा
ग्रामसभेत गावात कायम स्वरुपी दारू बंदीचा ठराव करीत पोलिसांना निवेदन
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :-
दि.१ फेब्रुवारी २४ गुरुवार
तालुक्यातील थोरगव्हाण येथे आयोजीत केलेल्या ग्रामसभेत गावात सुरु असलेली अवैध दारु विक्री कायम स्वरुपी बंद करण्याचा ठराव करीत सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,पोलिस पाटील व गावातील महिला व पुरुष यांनी थेट दारु विक्रेत्याच्या घरासमोरुन जावून दारु बंद करण्याची मागणी केली आहे.याबाबत सदर मागणीचे निवेदन सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,पोलिस पाटील व समस्त गावकऱ्यांच्या वतीने नुकतेच यावल पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील थोरगव्हाण येथील ग्रामपंचायतची ग्रामसभा काल दि.३१ जानेवारी बुधवार रोजी आयोजित करण्यात आली होती व या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मनिषा समाधान सोनवणे या होत्या.सदर ग्रामसभेत ग्रामसेवक भरत पाटील यांनी अंजेडा वरील विषय उपस्थित ग्रामस्थ व महिलांना वाचून दाखविले.प्रसंगी गावात अवैद्य हातभट्टीची दारु व देशी विदेशी दारु विक्री होत आहे व याकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.दारूमुळे गावात अनेकांची घरे उदव्धस्त होत आहे तर काही कीरकोळ वाद होऊन शांतता भंग होत असते तेव्हा या ग्रामसभेत संतप्त महिलांनी गावात कायम स्वरूपी दारु बंदी करण्यात यावी अशी मागणी केली व सरपंच मनिषा सोनवणे यांना निवेदन दिले तसेच सतंप्त महिलांनी निवेदन देवून थेट दारु विक्रेत्याच्या घरी मोर्चा नेला व समज देवून दारु विक्री तात्काळ बंद करा अन्यथा आम्ही पोलिस स्टेशला जावुन कारवाईची मागणी करु अशी तंबी दिली.आज शांततेत मोर्चा काढुन समज दिली आहे जर दारू बंद केली नाही तर मोठा उद्रेक होईल असा इशारा महिलांनी दिला आहे.सदरहू गावात चार ठिकाणी अवैद्य हातभट्टीची पन्नीतील दारु व देशी, विदेशी दारु राजरोजपणे विक्री होते या सर्वांनाच महिलांनी समज दिली.महिलांनी अशा प्रकारे दारू बंदी विरूध्द भुमीका घेतल्याने अवैद्य दारू विक्री करणाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत थोरगव्हाण येथील महीला व नागरीकांनी यावल पोलिस ठाण्यात ग्रामपंचायतकडून करण्यात आलेला दारू बंदीचा ठरावासह गावातील अवैद्य दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.सदरहू गावात अवैद्य दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे पोलिस उपनिरिक्षक सुनिल मोरे यांनी सांगीतले आहे. दरम्यान यावल तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन ग्रामसभा घेवुन थेट ठराव घेवुन दारू बंद करावी अशी मागणी करण्यात आली असुन पोलीस प्रशासनाकडून यासंदर्भात अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने ग्रामस्थ प्रशासनाच्या कारभारावर महीलांमध्ये मोठी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.