Just another WordPress site

यावल-भुसावळ मार्गावरील रस्ता काँक्रिटीकरणामुळे वाहतुकीचा खोळंबा;सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीस पर्यायी मार्ग देण्याची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२ फेब्रुवारी २४ शुक्रवार

यावल-भुसावळ या मार्गावरील राजोरा फाटा ते अंजाळे गावापर्यंत रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामास मागील आठ दिवसापासुन सुरूवात करण्यात आली आहे.दरम्यान या रस्त्यावरून नेहमी मोठया वाहनांची वर्दळ असल्याने तसेच विविध राज्यातुन जाणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकी साठी एकच पर्यायी मार्ग असल्याने या मार्गावर वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असते.परिणामी सदरील कामामुळे वाहतुकीचा खोळंबा झालेला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीस पर्यायी मार्ग देण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

सदरहू सदरील अडचणीबाबत कल्पना असतांना देखील संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने वाहतुकीबाबत कुठलीही तजवीज करण्यात आलेली नाही.या रस्त्यावर वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेता काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्याआधी वाहतुकीची होणारी अडचण लक्षात घेता वाहतुकीसाठी दुसरा पर्यायी मार्ग देणे हे अत्यंत गरजेचे असतांनाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे रस्त्याच्या काँकिटीकरणाचे काम सुरू असतांना त्याच रस्त्याची दुसरी बाजुचा मार्ग हा वाहतुकीसाठी सोडण्यात आल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होवुन वाहनधारकांना अडचण निर्माण झाली असुन अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.या वाहतुकीची नेहमीच वर्दळ असणाऱ्या मार्गावर अवजड वाहने रस्त्यावर वारंवार अडकल्याने वाहतुकीचा खेळखंडोबा होत असुन दोन दोन तास वाहतुक सुरळीत होण्यास लागत असल्याने वाहनधारकांना व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या मार्गावरील होणारी अवजड वाहनांची वाहतुक बंद करून ईतर मार्गावरून वळविण्यात यावी अशी मागणी नागरीकांसह वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.