गोपाल शर्मा,पोलीस नायक
अकोला जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२ फेब्रुवारी २४ शुक्रवार
भारतीय डाक विभागाच्या वतीने विविध डाक विभागातील योजनांची माहिती शहरी तथा ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी अकोला द्वारा विभागाचे प्रवर डाक अधीक्षक श्री.रेड्डी यांच्या आदेशानुसार आज दि.२ फेब्रुवारी गुरुवार रोजी तेल्हारा उपडाकघरच्या वतीने
मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
सदर मेळाव्यानिमित्ताने तेल्हारा शहरात आज दि.२ फेब्रुवारी शुक्रवार रोजी तेल्हारा उप डाकघरच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी डाक विभागाच्या महिला सन्मान बचत पत्र,सुकन्या समृद्धी योजना,आवर्ती ठेव,मुदत ठेव,पोस्टल लाइफ इन्शुरन्स,रूरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स या योजनांची माहिती सहायक डाक अधीक्षक के.के.तायडे यांनी दिली.परिणामी सदर योजनांचा लाभ विभागातील लोकांनी घेतला.सदरील मेळावा यशस्वीते करीता सहायक डाक अधीक्षक के.के.तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल राऊत,धनंजय इंगळे,धनराज बुंदेले,हरीश सपकाळ,मंगेश खुमकर,ज्ञानेश्वर बुंदे,प्राजक्ता राऊत,शिवाजी भिसे,निलेश नागपुरे,प्रतीक अवचार,विनोद गोठकडे,राजू चवरे यांनी यांनी परीश्रम घेतले.