Just another WordPress site

“गणपत गायकवाड म्हणत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे गोळीबार केला;गृहमंत्र्यांना आजच्या प्रकारानंतर उत्तर द्यायला तोंड उरले आहे का?” संजय राऊत यांचा सवाल

गणपत गायकवाड यांचे निवेदन महाराष्ट्रातल्या जनतेने समजून घेतले पाहिजे- संजय राऊत यांचे आवाहन

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.३ फेब्रुवारी २४ शनिवार

भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.उल्हासनगर येथील हिललाइन पोलीस स्टेशनमध्येच हा प्रकार घडला.या घटनेत महेश गायकवाड जखमी झाले आहेत त्यांना ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एका वृत्तवाहिनीशी चर्चा करतांना गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे मी गोळीबार केला असे म्हटले आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपाशी गद्दारी करणार आहेत ते गुन्हेगारी वाढवत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे यावरुन संजय राऊत यांनी आता फडणवीस यांच्याकडे या प्रकरणी काही उत्तर आहे का? असा सवाल केला आहे.

गणपत गायकवाड म्हणत आहेत की,एकनाथ शिंदे यांच्यामुळे मी गोळीबार केला आहे.त्यांचे म्हणणं आहे की,एकनाथ शिंदेंसारखे मुख्यमंत्री असतील तर गुन्हेगारच तयार होतील हे भाजपा आमदाराचे निवेदन आहे.मी वर्षभर सांगतोय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून गुन्हेगाऱ्यांच्या टोळ्यांना कसे दूरध्वनी कसे जात आहेत ते मी सांगितले.मुंबई,पुणे,कोल्हापूर इथल्या तुरुंगातल्या गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढले गेले आहे.मी सगळ्यांची नावेही देऊ शकतो असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.हे सगळे फक्त राजकारणासाठी चालले आहे.एका गुंडाचा पुण्यात खून झाला.मुंबईत तेच सुरु आहे.गुंड टोळ्यांच्या हाती कायदा दिला आहे.तुम्ही सांगाल तो कायदा आम्हाला निवडणूक जिंकून द्या असे  चालले आहे.महेश गायकवाड यांच्यावर आमदाराने केलेला गोळीबार धक्कादायक आहे असे संजय राऊत यांनी नमूद केले आहे.

गृहमंत्री आम्हाला कायदा शिकवतात,आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? शिवसेना,खरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याबाबतच कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही हा नियम आहे का? विरोधी पक्षाचा कार्यकर्ता असता तर विनाचौकशी त्याला फासावर लटकवले असते.तुमच्या जिल्ह्या माफियांचे राज्य चालले आहे.नागपूर,ठाणे,मुंबई,पुणे या जिल्ह्यांमध्ये राजकीय स्वार्थासाठी आणि निवडणूक जिंकण्याठी गुन्हेगार आणि माफियांना संरक्षण दिले जात आहे.महाराष्ट्रातले हे चित्र अत्यंत भयावह आहे.गृहमंत्र्यांना आजच्या प्रकारानंतर उत्तर द्यायला तोंड उरले आहे का?” असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांचे निवेदन सामान्य जनतेने समजून घेतले पाहिजे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मी गोळीबार केला असे ते म्हणत आहेत कारण मुख्यमंत्रीच गुन्हेगारांना पाठिशी घालत आहेत आणि मदत करत आहेत हे भाजपा आमदाराचे निवेदन आहे.दीर्घ काळ ते आमदार आहेत त्यांनी शिंदे यांच्या राजवटीत गुन्हेगारांची पैदास सुरु झाली आहे हे भाजपाचा आमदार सांगतो.देवेंद्र फडणवीस यांनी आता यावर बोलले पाहिजे असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.राऊत पुढे म्हणाले,महाराष्ट्र इतक्या रसातळाला कधीच गेला नव्हता.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये हा गोळीबार झाला आहे.राम तुमच्या बाजूने आहे,देवेंद्र फडणवीस यांना विचारायचे आहे की तुमचे राज्य कायद्याचे आहे का? ज्या आमदाराने गोळीबार केला आहे त्याला जामीन मिळेल.पुण्यात तीन भयंकर गुन्हेगारांना जामीन मिळण्यासाठी सरकारमधल्या मंत्र्यांनी जो हस्तक्षेप केला आहे त्यांचीही नावे मी तुम्हाला देईन.गणपत गायकवाड यांच्या जामिनासाठी फोन जाईल असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.