नांदेड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३ फेब्रुवारी २४ शनिवारी
नांदेडच्या हिमायत नगर भागात ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार घडला असून समाजात असलल्या बदनामीच्या भीतने आई वडिलांनीच पोटच्या मुलीची हत्या केली.धारदार शस्त्राने मुलीवर सपासप वार करुन तिची हत्या केली.हिमायतनगर शहरातल्या नेहरु नगर भागात ही घटना घडली आहे.हिमायत नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मृत्यू झालेल्या मुलीच्या आई वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मुलीला एका मुलाशी लग्न करुन त्याच्याबरोबर राहायचे होते याच रागातून या मुलीची हत्या करण्यात आली.याप्रकरणी आम्ही पुढील तपास करतो आहोत अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे.नांदेड जिल्ह्यातील हिमायत नगर या ठिकाणी एका कुटुंबातल्या मुलीचे एका युवकाशी प्रेमसंबंध जुळले.मुलीच्या घरातल्यांना जेव्हा हा प्रकार कळला तेव्हा त्यांनी तिची समजूत काढली.महिन्याभरापूर्वी ही मुलगी तिच्या प्रियकराबरोबर पळून गेली त्यावेळी मुलीच्या घरातल्यांनी युवकाविरोधात तक्रार केली होती.गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनीही मुलीला समजूत घातली आणि तिला आई वडिलांच्या स्वाधीन केले होते. मात्र मुलीच्या वागण्यात काही सुधारणा झाली नाही.ती पळून गेलेल्या मुलाबरोबर लग्न करायचे असा अट्टाहास करत होती.ज्यानंतर मुलीच्या आई वडिलांनी तिला धारदार शस्त्राचे वार करुन तिला ठार केले आहे.आई-वडिलांनी मुलीच्या वागण्याला कंटाळून आणि समाजात होत असलेल्या बदनामीच्या भीतीने ती गुरुवारी मध्यरात्री गाढ झोपेत असतांना आई वडिलांनी धारदार शस्त्राने शरीरावर वार करून तिचा खून केला.दरम्यान घटनेनंतर आई वडिलांनी मुलीला शासकीय रुग्णालयात दाखल केले.लेकीने आत्महत्या केली असा बनाव आई वडिलांकडून केला जात होता मात्र मुलीच्या शरीरावर जखमा आढळून आल्याने डॉक्टरांना संशय आला आणि डॉक्टरांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली.शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृत मुलीच्या आई वडिलांना ताब्यात घेतले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.