“शासन आपल्या दारी आणि सामान्य प्रवासी जनता वाऱ्यावरी”-जलीलदादा पटेल प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी कथन केली आपबिती
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.६ फेब्रुवारी २४ मंगळवार
काल दि.५ फेब्रुवारी सोमवार रोजी जलीलदादा सत्तार पटेल,प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हे यावल येथून मुंबईला जाण्यासठी यावल-भुसावळ बसमध्ये बसून प्रवास केला असता सदर बस हि यावल येथून दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी निघाली आणि चक्क भुसावळला ५ वाजून १० मिनिटांनी पोहचली सदरहू यावल येथून भुसावळला पोहचण्याचा निर्धारित वेळ हा ३० मिनिटांचा असल्याने वाहनचालकाच्या टाईमपासमुळे हि बस तब्बल एक तासाने भुसावळला पोहचली.परिणामी जलील पटेल यांच्यासह अनेक प्रवाशांचे ट्रेन रिझरवेशन असतांना संबंधित वाहनचालकाच्या दुर्लक्षपणामुळे तमाम प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागला तसेच आर्थिक नुकसान झाले ते वेगळे ! सदरील बस उशिरा पोहचण्यास उशीर का झाला तर एकाच मार्गावर चार बसेस एका मागे एक चालत होत्या व कोणताही चालक गाडी एकमेकांच्या पुढे घ्यायला तयार नव्हता ! हे विशेष .परिणामी “शासन आपल्या दारी आणि सामान्य प्रवासी जनता वाऱ्यावरी” अशी परिस्थिती जलीलदादा पटेल प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी पोलीस नायक प्रतिनिधीजवळ आपबिती कथन करून वाहनचालकांच्या मनमानी कारभाराचा नजराणा जनतेसमोर सादर केला आहे.
याबाबत जलीलदादा पटेल,प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की,मी यावल येथून काल दि.५ फेब्रुवारी रोजी मुंबईला जाण्यासाठी निघालो असतांना यावल तेथून ४.१० वाजता निघालेली बस हि वाहनचालकाच्या पुढे जाण्यास तयार नसल्याच्या कारणामुळे ३० मिनिटांऐवजी १ तासाने पोहचण्याची वेळ आली.परिणामी जलील पटेल यांच्यासह अनेक प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.या दरम्यान महामंडळाच्या ४ बसेस यावल-भुसावळ रस्त्यावर एकामागे एक चालत होत्या त्यात यावल डेपोच्या ३ आणि भुसावळ डेपोची १ बस अशा बसेस भुसावळकडे मार्गक्रमण करीत होत्या.यावेळी प्रवासी विनंती करत असतांना सुद्धा कोणताही चालक गाडी एकमेकांच्या पुढे घ्यायला तयार नव्हता त्यामुळॆ अधिकारी काय करताय हे तुम्हाला सांगायची गरज नाही.सदरील घटनेबाबत आज दि.६ फेब्रुवारी रोजी जलील पटेल हे मुंबईत परिवहन मंत्र्यांची भेट घेऊन सदर व्हिडीओ आणि गाडी नंबर सादर करुन नियोजन शुन्य अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करणार आहे असल्याचे जलिलदादा पटेल यांनी म्हटले आहे.दरम्यान शासन स्तरावरून संबंधित वाहक व चालकांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले असल्याचे जलील पटेल यांनी नुकतेच कळविले आहे.