Just another WordPress site

कुख्यात गुंडांचे मुख्यमंत्र्यांबरोबर फोटोच्या विरोधकांच्या टीकेनंतर दादा भुसे यांचे प्रतीउत्तर

दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेलाही दादा भुसे यांनी उत्तर दिले आहे.संजय राऊत यांनी पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे फोटो शेअर केले आहेत तसेच काही गुंडांनी मंत्रालयाच्या आवारात कथित रील्स शूट केले आहेत हे रील्स सध्या व्हायरल होत आहेत.विजय वडेट्टीवार यांनी या रील्सवरून राज्य सरकारवर टीका केली आहे.या टीकेला उत्तर देताना दादा भुसे म्हणाले,आम्ही गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे समर्थन करत नाही.गर्दीत कोणी आला असेल,मुख्यमंत्री सतत गर्दीत असतात.याआधी वर्षा बंगल्यावर विशिष्ट लोकांना सोडण्यात येत होते आता सर्वसामान्य नागरिकही वर्षावर जात आहेत.इतक्या किरकोळ गोष्टीचा बाऊ करणे योग्य नाही जे आरोप करत आहेत त्यांचेही फोटो आम्ही दाखवू शकतो.गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे आम्ही समर्थन करत नाही त्यांच्यावर कारवाई होईल तसेच संजय राऊतांकडे हल्ली कोणी गांभीर्याने पाहत नाही.राऊत सातत्याने गणपत गायकवाडांचा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत त्यामुळे राऊत स्वतः गणपत गायकवाड यांच्याकडे हिशेब घेण्यासाठी गेले होते का? असा प्रश्न पडला आहे असे दादा भुसे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.