वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष-प्रवीण साळुंके म्हणजे खाकीवर्दीच्या आत माणुसकीचे मापदंड जोपासणारे पोलीस अधिकारी
संकलन :- पो.ना.विनोद अहिरे,
पोलीस मुख्यालय जळगाव -९८२३१३६३९९
कोणी जन्मतःच मोठे असतात तर कोणावर मोठेपण लादले जाते तर कोणी स्वकर्तृत्वाने मोठेपण प्राप्त करत असते.असेच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये स्वकर्तृत्वाने मोठेपण प्राप्त करणारे पोलीस अधिकारी म्हणजे प्रवीण साळुंके साहेब.२००२ ते २००५ या कालावधीत जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असताना त्यांचे कार्य अत्यंत जवळून पाहण्याचा योग आला.साहेबांनी माझ्यासारख्या एक वेळ जेवणाची भ्रांत असणाऱ्या अनेक गरीब खेळाडूंना पोलीस खात्यात भरती केले त्यापैकी अनेक खेळाडू आज पोलीस अधिकारी आहेत.६ फेब्रुवारी साळुंके साहेबांचा जन्मदिवस आज त्यांच्यावर काहीतरी लिहावे म्हणून हा छोटासा प्रयत्न.
प्रवीण साळुंके जेव्हा जळगावला पोलीस अधीक्षक म्हणून आले तेव्हा मी पोलीस कर्मचारी व पोलीस बॉईज यांना कराटे प्रशिक्षक म्हणून जळगाव पोलीस दलात एक हजार रुपये मानधनावर कार्यरत होतो.प्रशिक्षक म्हणून साहेबांनी मला रविवार सुटिचा दिवस असल्याने त्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलविले तेव्हा माझ्या मनात काही प्रमाणात भीती होतीच मी आत मध्ये गेलो असता फोन ऑर्डरली गणेश वाघ यांनी साहेबांना निरोप दिला.मला तात्काळ आत बोलविणे झाले.उंच,सर्वसाधारण शरीर यष्टी,चेहऱ्यावर तेजपुंज धारण केलेले पांढराशुभ्र कुर्ता पायजमा परिधान केलेले साहेब खुर्चीवर बसलेले होते.अगोदर माझा परिचय घेऊन मला विचारणा केली की,माझ्या मुलाचे रीतसर ऍडमिशन करून घ्या परंतु एसपीचा मुलगा आहे म्हणून त्याला कोणतीही सूट द्यायची नाही किंवा विशेष ट्रीटमेंट आपण देता कामा नये.आपल्यासाठी सर्व मुले समान असले पाहिजे.मी आपले हो म्हणत होतो हे सर्व ऐकत असताना साहेबाबद्दलचा आदर कितीतरी पटीने मनामध्ये वाढला.गेले तीस वर्षापासून विविध खेळाचे प्रशिक्षण देत असताना पालक जेव्हा भेटायला येतात तेव्हा प्रत्येक पालकांची हीच इच्छा असते की आपल्या मुलाकडे विशेष लक्ष दिले गेले पाहिजे.एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा व्हीआयपी ट्रीटमेंट नको,खऱ्या अर्थाने साळुंके साहेबांसारखे व्यक्तिमत्व दुर्मिळच असते.चिरंजीव प्रणव याने देखील कराटेची ट्रेनिंग घेऊन ब्राऊन बेल्टपर्यंत मजल मारून अनेक स्पर्धा गाजवल्या,आजही प्रणव आणि माझे स्नेह आहे.साळुंकेसाहेब जळगावमध्ये पोलीस अधीक्षक असतांना आपल्या कल्पकतेने अनेक योजना त्यांनी राबवल्या त्यापैकी काहींचा ऊहापोह येथे झालाच पाहिजे.
अनेक जोडप्यांचे पुनर्मिलन आयुष्य जगत असतांना संसार क्षितिजावर अनेक समज-गैरसमज होतात तथा अगदी शुल्लक कारणांनी अंधाराची गडद छाया पसरत असते संपूर्ण आयुष्य त्या दांपत्याला अंधार यात्री म्हणूनच जगावे लागते.साळुंके साहेबांनी जळगाव पोलिसातील महिला दक्षता विभागाच्या माध्यमातून पत्नी सौ.स्मिता साळुंके यांना सोबत घेऊन पोलीस मल्टी पर्पज हॉलमध्ये अनेक जोडप्यांना बोलवून त्यांच्यामधील रुसवे-फुगवे दूर करून उजेडाची नवी दिशा दाखवली आहे त्यापैकी अनेकांचे संसार सुरळीत होऊन आजही त्यांना मिळणारे संसारिक सुखाचे श्रेय ते साळुंके दांपत्याला देत असतात त्याचबरोबर गरीबीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या कचरा वेचणारे मुले असोत की बूट पॉलिश करणारे मुले अशा अनेक मुलांना शिक्षणाची व्यवस्था लावून दिली.पोलीस कल्याण विभागाकडे विशेष लक्ष कोणताही पोलीस अधिकारी असो प्राधान्याने ते आपल्या अधिकार क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था कशी अभाधित राहील,चोऱ्या घरफोड्या कशा उघडकीस येतील यावरच आपली संपूर्ण शक्ती पणाला लावत असतात आणि ती लावलीही पाहिजे.साळुंके साहेबांच्या काळात देखील अनेक महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आले पण त्याचबरोबर पोलीस दलातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा पोलीस दलातील पोलीस कल्याण विभागाकडेही त्यांनी विशेष लक्ष दिले.त्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले त्यातील पोलीस कुटुंबीयांसाठी आनंदमेळा अजूनही स्मरणात आहे.पोलीस बॉईजसाठी अत्यंत अल्पदरात जिम,कराटे प्रशिक्षण वर्ग,योगा,शिवण क्लासेस,टेनिस अशा अनेक सुविधा पोलीस कुटुंबीयांना दिल्या जेव्हा जिल्हापेठ पोस्टेच्या रस्त्याने आम्ही जात असतो तेव्हा साळुंके साहेबांनी सुरू केलेला दक्षता पेट्रोल पंप त्यांच्या कार्याची आठवण करून देत असतो.पेट्रोल पंप चालकांनी आपल्या मागण्यांसाठी अनेक वेळा संप पुकारले पण दक्षता पेट्रोल पंपाने संपात भाग न घेता जळगाव शहरातील वाहनांची गती सुरू ठेवण्याचे काम केले आहे.
क्रीडा कलेचे उपासक आपल्या दैनंदिन जीवनात कितीही व्यस्त असले तरी एक तास साहेब व्यायामासाठी देणार म्हणजे देणार.साहेब स्वतः टेनिसचे उत्कृष्ट खेळाडू आहेत त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाच्या अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत.जळगाव जिल्हा पोलीस दलातील विभागीय नाशिक परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये जहाचार्या हे साहेबांनी गायलेले गाणे अजूनही प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या स्मरणात आहे.निरोप समारंभातून नागरी सत्कार कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याची बदली होते तेव्हा एक औपचारिकता म्हणून अधिकारी कर्मचारी त्यांना निरोप समारंभाचे आयोजन करून निरोप देत असतात परंतु जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासामध्ये प्रवीण साळुंके साहेब एकमेव असे पोलीस अधिकारी आहेत की जळगाव जिल्ह्यातून बदली झाल्यावर रिंग रोडवरील जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहात जनतेने स्वयंप्रेरणेने पुढाकार घेऊन नागरी सत्कार करून साहेबांना निरोप दिला होता.साहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा संपूर्ण लेखा जोखा मांडायचा झाला तर एका गौरव ग्रंथाचीच निर्मिती होईल येणाऱ्या काळात तो ग्रंथ लिहिण्याचा आमचा मानस आहे.प्रवीण साळुंखे साहेब हे अपर पोलीस महासंचालक म्हणून मुंबई येथे कार्यरत आहे ते लवकरच पोलीस महासंचालक व्हावेत अशीच त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा.
शेवटी साहेबांबद्दल एवढेच म्हणेल.
वेदनांच्या विराट रणभूमीवरील एक अपराजित सेनापती त्यागाचा अग्नीध्वज आपल्या खांद्यावर घेऊन रक्त भंबाळ पावलांनी निघालेला महाराष्ट्र पोलीस दलाचा समर्पित सरदार सोज्वळ व्यक्तित्वाचे पारदर्शी कर्तुत्वाचे,खाकी वर्दीच्या आतमध्ये लपलेला एक धगधगता ज्वालामुखी……
संकलन :- पो.ना.विनोद अहिरे,
पोलीस मुख्यालय जळगाव.
९८२३१३६३९९
लेखक जळगाव जिल्हा पोलीस दलातील साहित्यिक,कवी आहेत.