Just another WordPress site

“पंतप्रधान मोदी,अमित शाह हे खरे गुन्हेगार..”, राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची संजय राऊत यांची मागणी

शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांची गोळीबार प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या टोळीत गुंड आणि पोलिसांचा समावेश केला आहे.मुंबई आणि ठाण्यासह प्रमुख शहरांत ज्या पोलिसांच्या नेमणूका केल्या गेल्या आहेत ते सर्व शिंदे टोळीचे सदस्य आहेत.पोलीस जर पोलिसांसारखे वागणार नसून जर खाकी वर्दीतील गुडांप्रमाणे वागत असाल तर या राज्यातील जनता दूधखुळी नाही.कल्याणमध्ये आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणात शिंदे पिता-पुत्रांचे नाव घेण्यात आले आहे.पोलिसांनी याप्रकरणी ताबडतोब चौकशी करायला हवी.गणपत गायकवाड यांनी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊनही मुख्यंमत्र्यांच्यी साधी चौकशी होत नाही.झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली.दिल्लीत केजरीवाल यांची चौकशी सुरु आहे पण महाराष्ट्रात शिंदेंना साधा जाबही विचारला जात नाही हे अत्यंत दुर्दैव आहे अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.संजय राऊत पुढे म्हणाले,काल शिवसेनेतील आमचे जवळचे सहकारी,कडवट शिवसैनिक विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली.या हत्येनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला दिसत आहे.महाराष्ट्राच्या इतिहासात असे कधी घडले नव्हते.गेल्या दीड वर्षात फक्त गुंडगिरीच्या बातम्या कानावर येत आहेत.पुण्यामध्ये मोहोळची हत्या झाली.नगरमध्ये आमदार गुंडगिरी करून लोकांच्या जमिनी ताब्यात घेत आहेत.राहुरीमध्ये आढाव वकील दाम्पत्याची हत्या झाली.मुंबईमध्ये अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली मात्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अदृश्य आहेत त्यांनी कुठे असायला हवे? मात्र फडणवीस भाजपा कार्यकर्त्यांन घेऊन चाय पे चर्चा करत आहेत त्यांनी राज्याच्या बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा करायला हवी.

अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेज डोंगर कठोरा येथील प्राचार्य तसेच माझे जिवलग मित्र व वरिष्ठ बंधू मा.श्री.नितीन झांबरे सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!
???????????????????? शुभेच्छुक :- श्री.बाळासाहेब व्ही.आढाळे,मुख्य संपादक पोलीस नायक न्यूज पेपर (महाराष्ट्र राज्य)????????????????????????

मुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस आहे म्हणजे आणखी १००-२०० गुंड शुभेच्छा देण्यासाठी येतील.राज्यात राजरोसपणे हत्या होत असताना मुख्यमंत्री वाढदिवस काय साजरे करत आहात? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.आजच्या दिवशी त्यांना एवढ्याच शुभेच्छा देतो की दीड वर्ष मुख्यमंत्री पद भोगले व महाराष्ट्राची वाट लावली,आता बाजूला व्हा.दिल्लीच्या मदतीने महाराष्ट्राची वाट लावली.खोके जमले,खोके वाटले.आमच्या लोकांना तुरुंगात टाकले,आता बास करा असेही संजय राऊत म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.