Just another WordPress site

यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची जळगाव पोलीस मुख्यालयात तडकाफडकी बदली तर प्रभारीपदी हरीष भोये यांची नियुक्ती !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.९ फेब्रुवारी २४ शुक्रवार

तालुक्यातील दहिगाव गावातील तणावाच्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मानगावकर यांची पोलीस मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आले आहे तर त्यांच्या जागी प्रभारीपदी रावेरचे सपोनि हरीष भोये यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज दि.९ फेब्रुवारी शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता पदभार घेतला आहे.सदरील कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेज डोंगर कठोरा येथील प्राचार्य तसेच माझे जिवलग मित्र व वरिष्ठ बंधू मा.श्री.नितीन झांबरे सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!
???????????????????? शुभेच्छुक :- श्री.बाळासाहेब व्ही.आढाळे,मुख्य संपादक पोलीस नायक न्यूज पेपर (महाराष्ट्र राज्य)????????????????????????

यावल तालुक्यातील दहिगाव येथे परवा रात्री दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला.दरम्यान पोलीस प्रशासनाने तात्काळ धाव घेत वातावरण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र काल दिवसभर गावात मोठ्या प्रमाणातमध्ये तणावाचे वातावरण दिसून आले.दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून सहायक जिल्हाधिकारी तथा फैजपुरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी अर्पित चौहान यांनी दहिगावात गुरूवार दि. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेपासून ४८ तासांसाठी संचारबंदी लागू केली आहे.या संदर्भातील निर्देश जारी करण्यात आले आहेत.संचारबंदीच्या कालावधीत कुणालाही घराबाहेर पडता येणार नसून अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता सर्व दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने देखील बंद राहणार असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.दरम्यान या दंगलीच्या विषयाला घेवून यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची जळगाव येथील पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी रावेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये यांची प्रभारीपदी नियुक्त करण्यात आली आहे. अशी माहिती विश्वसनिय सुत्रांकडून मिळाली आहे. या बदलीमुळे जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.