“…तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवे”-राज ठाकरे यांची मागणी
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.९ फेब्रुवारी २४ शुक्रवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजही तीन भारतरत्न पुरस्कारांची घोषणा केली असून काँग्रेसचे नेते व देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारे डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.या पुरस्कारांनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत तसेच महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली असून बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे.माजी पंतप्रधान स्व.पी.व्ही.नरसिंहराव,स्व.चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचे अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे.इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता असो असे राज ठाकरे म्हणाले.
अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेज डोंगर कठोरा येथील प्राचार्य तसेच माझे जिवलग मित्र व वरिष्ठ बंधू मा.श्री.नितीन झांबरे सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!
???????????????????? शुभेच्छुक :- श्री.बाळासाहेब व्ही.आढाळे,मुख्य संपादक पोलीस नायक न्यूज पेपर (महाराष्ट्र राज्य)????????????????????????
पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून केंद्रातील भारतीय जनता पक्षप्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलेच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवे असेही राज ठाकरे म्हणाले.देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा.स्व.बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान कांशीराम यांनाही भारतरत्न द्यावा अशी मागणी मायावती यांनी केली आहे.त्या म्हणाल्या,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर व्हीपी सिंह यांच्या सरकारने भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केले त्यानंतर दलित आणि उपेक्षितांचे आदरस्थान कांशीराम यांनी केलेला संघर्ष काही कमी नव्हता त्यांनाही भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे असे मायावती यांनी म्हटले आहे.