“राज्यात गुंडांचे राज्य”;”राज्यात गां***च राज्य येते तेव्हा गुंडांचे राज्य सुरू होते”-संजय राऊत यांची परखड टीका
अभिषेक घोसाळकर काय कुत्र्याचे पिल्लू होते का? शिवसेनेच्या एका युवा कार्यकर्त्याची दिवसाढवळ्या हत्या झाली आरोपी भाजपाशी संबंधित आहे सर्व पुरावे आहेत.घोसाळकरांची आई,वडील,पत्नी,लहान मुलीचा आक्रोष गृहमंत्री फडणवीसांना विचलित करत नाही का? काय म्हणतो हा? आम्ही काय कुत्र्याचे मेलेले पिल्लू आहोत का? त्यांची आई,मुलगी कुत्र्याचे पिल्लू आहेत का? कसली भाषा आहे ही? असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.काल पुण्यात निखिल वागळेंवर भाजपाच्या गुंडांनी हल्ला केला.मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.ते काय कुत्र्याचे पिल्लू आहेत का? सत्तेत बसलेले हे लोक कोण आहेत? अमित शाहांना मी विचारू इच्छितो की हा महाराष्ट्र कुणाच्या हातात आहे? मेलेले कुत्र्याचे पिल्लू आहेत तर तुम्ही कोण आहात? दिल्लीत जाऊन कुत्र्यासारखे शेपूट हलवता आणि इथे येऊन आमच्यावर भुंकताय? पाहून घेऊ सरकारे बदलतील असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.मुख्यमंत्र्यांचा व त्यांच्या मुलाचा मी रोज एक फोटो पोस्ट करतोय.सर्व गुंड,खूनाचे आरोपी,माफिया यांच्यासोबत मुख्यमंत्री सेल्फी घेतात हे आपल्या राज्याचे चरित्र बनलंय.गुंडांचं राज्य गुंड चालवत आहेत असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.