“उद्धव ठाकरे यांची भाषा आणि त्यांचे शब्द पाहता मला हे ठामपणे वाटते की,उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे”
उद्धव ठाकरेंच्या ‘मनोरुग्ण’ टीकेला देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर
श्वान गाडीखाली मेले तर मी काय करू? असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल म्हटले त्यांनी कुत्र्याला श्वान हा शब्द वापरला.संस्कृत शब्द वापरून तुम्ही सुसंस्कृत होत नाहीत.तुम्ही अतिशय निर्ढावलेले,निर्घृण आणि निर्दयी मनाचे गृहमंत्री आहात.फडणवीस यांच्यासाठी मी याआधी फडतूस,कलंक असे शब्द वापरले होते पण आता हे शब्दही तोकडे पडत आहेत.महाराष्ट्राला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभला अशी टीका उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे केली होती.उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की,उद्धव ठाकरे यांची भाषा आणि त्यांचे शब्द पाहता मला हे ठामपणे वाटते की,उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.मी आता एवढेच म्हणेण की,गेट वेल सून.मी त्यांना बाकी काहीही प्रतिक्रिया देणार नाही.