महानुभाव पंथाचे दीक्षांत व्यासमुनी वैकुंठवासी शामराव महाराज यांनी ९९ व्या वर्षी घेतला आयुष्माचा अंतिम श्वास
मधुसूदन कोवे,पोलीस नायक
यवतमाळ जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.१२ फेब्रुवारी २४ सोमवार
महानुभाव पंथाचे दीक्षांत व्यासमुनी वैकुंठवासी शामराव महाराज यांची आयुष्यात ९९ वर्षे पूर्ण झाली होती व त्यांनी निःसंकोचपणे सर्व त्याग केला होता आणि हसत खेळत काल दि.११ फेब्रुवारी रविवार रोजी दुपारी १ वाजता आयुष्याचा अंतिम श्वास घेतला.शामराव महाराज यांना पुष्पांजली अर्पण करण्यासाठी मधुसूदन कोवे गुरुजी उपाध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ यांच्या पुढाकारा खाली नुकतेच आयोजन करण्यात आले .
सदरील कार्यक्रमात मधुसूदन कोवे गुरुजी उपाध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ यांच्या मार्गदशनाखाली गवळी समाजातील नातेवाईक,मित्र परिवार तसेच जेष्ठ मान्यवर अरुणभाऊ जोग अध्यक्ष जय विदर्भ पार्टी आणि विजय निवल शेतकरी संघटना यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.वैकुंठवासी व्यासमुनी शामराव महाराज हे भोंगाडे कुटुंबातील असून कृष्णाजी भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ यांचे वडील आहेत तसेच तिन भाऊ व दोन बहिणी,सुना,नातवंडे आणि सगे-सोयरे यांच्या दुःखात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,शेतकरी संघटनेचे नेते व पदाधिकारी,समाजातील प्रतिष्ठित नागरिक,विविध संघटनाचे सभासद व गवळी समाजातील नातेवाईक यांच्या उपस्थितीत वैकुंठवासी व्यासमुनी शामराव महाराज यांचा अंतिम संस्कार करुन मोक्षधाम यवतमाळ येथे भावपूर्ण पुष्पांजली वाहून अंतिम संस्कार करण्यात आले.