Just another WordPress site

“आज त्यांनी राजीनामा दिला असेल आणि जर ते भाजपात गेले तर याचा अर्थ त्यांचा आदर्श घोटाळा भाजपाला पवित्र करुन घ्यायचा आहे”

संजय राऊत यांची अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर खोचक प्रतिक्रिया

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१२ फेब्रुवारी २४ सोमवार

अशोक चव्हाण महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी झाले होते व त्यांनी जागा कुठल्या हव्यात हे देखील सांगितले होते परंतु आज त्यांनी राजीनामा दिला असेल आणि जर ते भाजपात गेले तर याचा अर्थ त्यांचा आदर्श घोटाळा भाजपाला पवित्र करुन घ्यायचा आहे अशी खोचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली तसेच काँग्रेस पक्षाबाबत त्यांनी केलेले विधानही चर्चेत आहे.अशोक चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाचे संपूर्ण आयुष्य हे काँग्रेस पक्षात गेले आहे.आज अशोक चव्हाण जे काही आहेत ते काँग्रेसमुळेच आहेत.भाजपाने त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी जंग जंग पछाडले होते.आदर्श घोटाळा भाजपाला जर पवित्र करुन घ्यायचा असेल तर आम्ही पाहू.कालपर्यंत ते आमच्यातच होते.महाविकास आघाडीच्या बैठकीला आले होते.अजूनही ते आमच्यात आहेत अशी मी आशा बाळगतो.कुणाला जर वाकडी पावले टाकायची असतील तर कोण अडवणार ?काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा जर शंकरराव चव्हाणांचे सुपुत्र देत असतील तर हे मुलाने आईला नाकारण्यासारखे आहे !! काँग्रेस फोडला जाईल का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले,काँग्रेस ही अजरामर म्हातारी आहे ती मरणार नाही कधीच.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा (विधानसभा सदस्यत्व) राजीनामा दिला आहे.या राजीनाम्यांनंतर अशोक चव्हाण भाजपात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे तसेच काही वृत्तवाहिन्यांनी दावा केला आहे की,अशोक चव्हाण हे १५ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करतील तसेच भाजपा अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.अशोक चव्हाण यांच्याबाबत वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलेले असतांना चव्हाण यांनी स्वतः प्रसारमाध्यमांसमोर येत या सर्व अफवांचे खंडण केले आहे तसेच पक्ष सोडण्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.अशोक चव्हाण म्हणाले,प्रत्येक गोष्टीला काही कारण असलेच पाहिजे असे काही नाही तसेच प्रत्येक कारण सर्वांना सांगितलेच पाहिजे असेही काही नाही.सगळ्याच गोष्टी जाहीर केल्या जात नाहीत.मी कधीही माझ्या पक्षांतर्गत बाबी लोकांसमोर, माध्यमांसमोर मांडल्या नाहीत तसेच पक्षात काही उणीदुणी असतील तर मी ती कधीही चव्हाट्यावर मांडली नाहीत.पक्ष सोडण्याच्या निर्णयाबाबत अशोक चव्हाण म्हणाले,मी सुरुवातीपासून काँग्रेसमध्ये आहे.आता मला वाटते की मी अन्य पर्याय पाहिले पाहिजेत म्हणून राजीनामा दिला आहे.काँग्रेस सोडणे हा माझा वैयक्तिक निर्णय आहे असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.