“सकारात्मक भूमिका घेऊन वाटचाल करता आली पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून भाजपात प्रवेश केला आहे”
देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश प्रसंगी अशोक चव्हाण यांची स्पष्टोक्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा लौकिक वाढवला आहे त्यामुळे त्यांचे काम हे वाखाण्याजोगे आहे असून त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी मला भाजपात प्रवेश दिला त्याचप्रमाणे गृहमंत्री अमित शाह,भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा या सगळ्यांचे आभार मानतो.महाराष्ट्रात सत्ताआधारी आणि विरोधक यांचे संबंध कायमच राजकारणापलिकडे असतात.आज मी आज नवी सुरुवात करतो आहे.मी ३८ वर्षांचा माझा राजकीय प्रवास आहे.मी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रेरणा घेऊन सकारात्मक भूमिका घेऊन वाटचाल करता आली पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून पक्षात प्रवेश केला आहे.मी जिथे होतो तिथेही प्रामाणिकपणे काम केले आहे.आजपासून भाजपात आलो आहे इथेही प्रामाणिकपणेच आणि निष्ठेने काम करणार आहे.माझा जो अनुभव आहे त्यातून भाजपाला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील यासाठी प्रयत्न करणार आहे.मी पक्ष सोडल्यावर अनेक लोक विरोधात बोलत आहेत.व्यक्तिगत स्वरुपाचे दोषारोप मी कुणावर केले नाहीत आणि करणारही नाही.भाजपात येण्याचा निर्णय हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे.मला कुणीही जा सांगितलेले नव्हते मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींची सबका साथ सबका विकास ही भूमिका पटल्याने मी भाजपात आलो आहे असेही अशोक चव्हाण म्हणाले.
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ फेब्रुवारी २४ मंगळवार
आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला असून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या भाजपा कार्यालयात हा सोहळा पार पडला.यानंतर अशोक चव्हाण यांनी आपण आता भाजपासाठी संपूर्ण निष्ठेने काम करणार आहोत असे म्हटले आहे तसेच भाजपात मी कुठल्याही पदासाठी आलो नाही असेही त्यांनी म्हटले आहे.भाजपा देईल ती जबाबदारी स्वीकारुन पूर्णपणे विकासासाठी काम करणार असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.भाजपात येण्याचा निर्णय का घेतला याचेही उत्तर त्यांनी दिले आहे.आज आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे की महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ नेतृत्व आमच्याकडे आले आहे.देशाची लोकसभा आणि विधानसभा गेली अनेक वर्षे ज्यांनी गाजवली.विविध मंत्रिपदे ज्यांनी भुषवली आणि दोनवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकीर्द आपल्याला पाहायला मिळाली असे अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करत आहेत.मी सर्वात आधी भाजपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती यांना अशोक चव्हाण यांचा प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्म आहे त्यावर सही करुन त्यांना भाजपात प्रवेश द्यावा.देवेंद्र फडणवीस यांनी हे सांगिल्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांना अर्ज दिला जो भरुन त्यांना प्रवेश देण्यात आला.