यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१३ फेब्रुवारी २४ मंगळवार
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती विश्रामगृहात तालुका वंचित बहुजन आघाडीची बैठक आज दि.१३ फेब्रुवारी मंगळवार रोजी यावल तालुका अध्यक्ष भगवानभाऊ मेघे व तालुका युनिट यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष शमीभाताई पाटील यांनी लोकसभा निवडणुकीकरिता खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना मांडल्या.यात जि.प,व प.स.गट,गणा मध्ये मीटिंगचे आयोजन करणे,बुथ कमिटी व सर्कल आढावा तसेच पक्ष बांधणी करणे,नवीन शहर कार्यकारिणी व ग्रामीण शाखा स्थापन करणे,गाव तिथे शाखा,घर तेथे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता निर्माण करणे,वंचित बहुजन आघाडी पक्षात ओबीसी व मुस्लिम आदिवासी बांधवांना सन्मानपूर्वक महत्त्वाचे पदे देणे,जे पदाधिकारी पक्षाला वेळ देऊ शकत नाही किंवा पक्षाचे काम करत नाही अशा पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करून त्यांच्या जागी नवीन कार्यकर्त्यांना मानाचे स्थान देण्यात यावे
अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.सदर बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे यावल तालुका अध्यक्ष भगवानभाऊ मेघे,किरण तायडे चितोडा,राजेश वानखेडे,मोहम्मद शफी यावल,तालुका शहर अध्यक्ष तैपूर कादरी,युवा जिल्हा संघटक भूषण साळुंखे,महासचिव राजेश गवळी,महासचिव संतोष तायडे किनगाव,भूषण तायडे सांगवी,अमोल तायडे सांगवी,ईश्वर तायडे कासारखेडा,किरण तायडे सांगवी,किरण मेढे सांगवी,सचिन बाऱ्हे लिधुर,आत्माराम कोळी,मनोज सोनवणे,शुभम भालेराव,ईश्वर युवराज तायडे,सुरेश मधुकर तायडे,कुरबान तडवी यांच्यासह बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकारी व तालुका कार्यकारणीतील पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.प्रसंगी वंचित बहुजन आघाडीमध्ये अनेक महिला व पुरुषांनी जाहीर प्रवेश केला.