Just another WordPress site

डोंगर कठोरा येथील आगग्रस्त कुटुंबियांना शासन व इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने मदतीचा हात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१३ फेब्रुवारी २४ मंगळवार

तालुक्यातील डोंगर कठोरा येथे दि.१० फेब्रुवारी शनिवार रोजी शॉर्टसर्किट मुळे लागलेल्या आगीत अनिल धनराज सरोदे व दगडू गेंदू पाटील यांच्या संसाराची राख रांगोळी झाली होती.सदरील घटनेची तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी तात्काळ दखल घेऊन सदरील दोन्ही कुटुंबियांना शासन व इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखेच्या वतीने ‘आपद ग्रस्तांना मदत साहित्य वाटप योजनेअंतर्गत मदतीचा हात देऊन आपली कार्यतत्परता दाखवून दिली आहे.सदरील कार्य तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी आपल्या कार्यालयीन वेळेत नाही तर संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास बजाविली हे विशेष !

याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील डोंगर कठोरा येथे दि.१० फेब्रुवारी रोजी येथील रहिवाशी अनिल धनराज सरोदे व दगडू गेंदू पाटील यांच्या घरांचे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत संसार उध्वस्त झाले होते.यात धान्यादी माल,जीवनावश्यक वस्तू व रोख रोकड असे एकूण ६ लाखांच्या वर या दोघांचे नुकसान झालेले आहे.सदरील घटनेची तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी गांभीर्याने दखल घेत व लागलीच पाठपुरावा करून या नुकसानग्रस्त कुटुंबियांना मदत मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलला आहे.तद्नुसार तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी केलेल्या शासन स्तरावरील पाठपुराव्यामुळे इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखेच्या वतीने आज दि.१३ फेब्रुवारी मंगळवार रोजी अनिल सरोदे व दगडू पाटील या कुटुंबियांना बादली,चटई,ताडपत्री,साड्या,हायजेनिक किट,भांडी सेट,मुलांचे कपडे,मच्छरदाणी व स्वेटर अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.त्याचबरोबर अनिल सरोदे यांचे या आगीत संपूर्ण कागदपत्रे जळाल्यामुळे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडून शासनाच्या वतीने रेशनकार्ड देण्यात आले.प्रसंगी माझ्या परीने शक्य होईल तितकी मदत देण्यात येईल व जास्तीत जास्त मदत मिळण्याकरिता शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.तर माझ्या परीने मी लागलीच म्हणजे काल दि.१२ फेब्रुवारी सोमवार रोजीच मी जिल्हाधिकारी व वीज अधिकारी यांना मदतीसाठी पाठपुरावा केला असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली तसेच सदरील कुटूंबियांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत गावस्तरावरून आर्थिक मदत जमा करण्यास सुरुवात करण्याबाबत चर्चा झाली असता ग्रामपंचायतीनेही आपण योगदान देण्याचे जाहीर केले असता तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी देखील तहसील कार्यालयामार्फत देखील आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले.

प्रसंगी इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखेच्या वतीने मदतीचा हात म्हणून अनिल सरोदे व दगडू पाटील या कुटुंबियांना देण्यात आलेल्या संसार उपयोगी कीटबाबत गावकऱ्यांच्या वतीने कौतुक करण्यात आले.”एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ” या उक्ती नुसार तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटी अध्यक्ष जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या कार्यकुशल मार्गदर्शनाखाली आमच्या इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखेच्या वतीने आपदग्रस्त कुटुंबियांना मदत करून आम्हीही या योगदानात खारीचा वाट उचलला असल्याची भावना इंडियन रेडक्रॉस सोसायटी पी आर ओ उज्ज्वला वर्मा यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.यावेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटी पी आर ओ उज्ज्वला वर्मा यांच्यासह उपाध्यक्ष गाणी मेमन,चेअरमन विनोद बियाणी,रक्त केंद्र चेअरमन प्रसन्नकुमार रेदासनी,आपत्ती व्यवस्थापन चेअरमन सुभाष साकला,ऑफिस अससिस्टन्ट मनोज वाणी,सरपंच नवाज तडवी,उपसरपंच धनराज पाटील,पोलीस पाटील राजरत्न आढाळे,तलाठी वसीम तडवी,ग्रामपंचायत सदस्य दिलीप तायडे,कोतवाल विजय आढाळे,ग्रामस्थ भोजराज पाटील,गंगाधर जावळे,योगेश ठोंबरे,दत्तू गुरव,रवींद्र पाटील,संजय आढाळे,दुलचंद पाटील,गणेश जावळे,ललित पाटील यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.