Just another WordPress site

यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हर्षल पाटील खान्देश गौरव पुरस्काराने सन्मानित

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१६ फेब्रुवारी २४ शुक्रवार

यावल तालुक्यातील सातोद येथील रहिवाशी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व युवा सामाजिक कार्यकर्ते हर्षल गोंविदा पाटील यांचा सप्तरंग मराठी चॅनलव्दारे आयोजीत सत्कार सोहळा कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या खान्देश गौरव पुरस्काराने तालुक्यातील सातोद येथील रहीवाशी तथा राजकीय,सामाजिक व शैक्षणीक,कृषी क्षेत्रात भरीव अशी लक्ष वेधणारी कामगिरी करणारे जिल्हा परिषदचे माजी सदस्य तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हर्षल गोविंदा पाटील यांना नुकतेच खान्देश गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

जळगाव येथे सप्तरंग मराठी चॅनलच्या वतीने हॉटेल प्रोसिडेंट कोटेजच्या सभागृहात संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्यात सुप्रसिद्ध मराठी व हिंदी चित्रपटातील सिने अभिनेत्री श्रीमती प्रिया बेर्डे यांच्या हस्ते व डॉ.उल्हास पाटील ,अॅड नारायण लाठी,डॉ.मुलचंद उदासी,अॅड संजय राणे,डॉ. प्रकाश महाजन,मोतीभाऊ मुनोत यांच्या प्रमुख उपस्थितीत खान्देश गौरव-२०२४ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.हर्षल पाटील यांना मिळालेल्या पुरस्काराचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे,उपाध्यक्ष हिरालाल चौधरी,शरद महाजन,कृउबाचे संचालक व भाजयुवा मोर्चाचे राकेश फेगडे,कृउबाचे माजी सभापती नारायण चौधरी,जिल्हा परिषद माजी सदस्या सविता भालेराव,पंचायत समिती माजी सभापती पल्लवी चौधरी,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अज्जैनसिंग राजपुत,विलास चौधरी,नागेश्वर साळवे यांच्यासह आदी मान्यवरांनी स्वागत केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.