यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१६ फेब्रुवारी २४ शुक्रवार
तालुक्यातील राजोरा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते व पक्षाची यशस्वी धुरा सांभाळणारे सागर नामदेव कोळी यांची पुनश्च भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या यावल तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांनी सर्वानुमते तसेच सागर नामदेव कोळी यांची पक्षाच्या प्रचार प्रसार व संघटन बांधणीसाठी केलेल्या कामगिरीची दखल घेत पक्षाच्या वतीने त्यांची पुनश्च भाजपा युवा मोर्चाच्या यावल तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.सागर कोळी यांच्या निवडीचे राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन,खासदार रक्षाताई खडसे,जिल्हाध्यक्ष अमोलभाऊ जावळे,जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी,जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हर्षल पाटील,जिल्हा परिषद माजी शिक्षण समिती सभापती रविन्द्र ( छोटू भाऊ ) पाटील,कृउबा माजी सभापती नारायण चौधरी,कृउबा संचालक राकेश फेगडे,उज्जैनसिंग राजपुत, भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी,युवा मोर्चाचे व्यंकटेश बारी,राहुल बारी,रितेष बारी,भुषण फेगडे,दहिगाव उपसरपंच देवीदास धांगो पाटील,खरेदी विक्री संघ संचालक अतुल भालेराव यांनी स्वागत केले आहे.