यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१६ फेब्रुवारी २४ शुक्रवार
येथील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ‘मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा ‘ या उपक्रमाचे औचित्य साधून शिक्षण विभाग पंचायत समिती यावल तसेच यावल तालुका कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने यावल तालुकास्तरीय भव्य चित्रकला प्रदर्शनाचे नगर परिषद संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक यावल येथे नुकतेच आयोजित करण्यात आले.सदर प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस शालिग्राम भिरुड यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहनमाला नाझिरकर याच्या शुभहस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एम.के.पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून यावल नगर परिषदेचे आरती खाडे,जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष एन.ओ.चौधरी,जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाचे उपाध्यक्ष अजय पाटील, सचिव अरूण सपकाळे,चोपडा ललित कला केंद्राचे सेवानिवृत्त प्राचार्य राजेंद्र महाजन,खिरोदा येथील सप्तपुट ललित कला भवनचे प्राचार्य अतुल मालखेडे.यावल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयंत चौधरी,सानेगुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.के.पाटील,ग.स. सोसायटीचे संचालक योगेश इगळे,प्रोटॉन संघटनेचे गणेश काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावल तालुका कलाध्यापक संघाचे अध्यक्ष विजय नन्नवरे,उपाध्यक्ष चंदन भालेराव,अनिल वंजारी,कार्याध्यक्ष हितेंद्र धांडे,सचिव संतोष वानखेडे,सहसचिव कैलास पवार यांच्यासह अजय पाटील,संजीव बोठे यांनी परिश्रम घेऊन यावल तालुका पंचायत समिती व कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय प्रदर्शन जिल्ह्यात प्रथमच आयोजन करण्यात आले.सदर प्रदर्शनात शासकीय माध्यमिक शाळा तसेच इंग्रजी मिडीयम शाळा मिळून एकूण ३८ शाळेचा सहभाग लाभला.यावल येथे पहिल्यांदाच तालुकास्तरीय भव्य चित्रकला प्रदर्शन हे कलाप्रेमींसाठी एक मोठी पर्वणी ठरली.दरम्यान तालुका कला प्रदर्शनात सहभागी चित्राचे परीक्षण प्राचार्य राजेंद्र महाजन चोपडा तसेच प्राचार्य अतुल मालखेडेसर यांनी परीक्षण केले.यात कु.चातुर्य लक्ष्मण पाटील आदर्श विद्यालय दहिगाव,कू.प्रीती राहुल साळवे न्यू इंग्लिश स्कूल भालोद, कू.जिया फातिमा नासिर अंजुमन इस्लाम उर्दू हायस्कूल साकळी,हर्षदा जंगलू कापडे पी.एस.एम.एस.बामणोद,शेख तोफिक शेख आरिफ डॉ.झाकीर हुसेन हायस्कूल यावल,अजय विनोद लोढे प्रभात विद्यालय हिंगोणा,शिवम अनिल पाटील इंग्लिश एम.पी.एस.स्कूल डोणगाव,यश कमलाकर इंगळे जेटी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल फैजपुर,निनाद निलेश कोल्हे भारत विद्यालय न्हावी,भुवनेश्वर चुडामण पाटील साने गुरुजी माध्यमिक विद्यालय यावल,निकिता जगदीश चऱ्हाटे शारदा विद्यालय साकळी,हर्षा विनोद चौधरी स्व.दादासो द.रे.माध्यमिक वी. दुसखेडा यांना मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृती चिन्ह देऊन गौरवण्यात आले.स्पर्धा यशस्वीतेसाठी अजय पाटील जिल्हा कलाद्यापक संघ उपाध्यक्ष,विभागीय उपाध्यक्ष संजीव बोठे,यावल तालुका कलाध्यापक संघ विजय नन्नावरे,सचिव कैलास वानखेडे,कर्याधक्ष हितेंद्र धांडे,उपाध्यक्ष चंदन भालेराव,अनिल वंजारी,सहसचिव कैलास पवार यांच्यासह तालुका कला शिक्षकांचे बहुमोल सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल महाजन यांनी केले तर आभार संतोष वानखेडे यांनी मानले.