जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
मुंबईत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या शिफारशी वरून यावल तालुक्यातील कोरपावली येथील माजी सरपंच जलील सत्तार पटेल यांची काँग्रेस निराधार निराश्रित सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.सदरील नियुक्ती निराधार सेलच्या प्रदेशाध्यक्षा राधिका मखमाले यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत जलील पटेल यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.
यावेळी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे,प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष नाना गावंडे,प्रदेश सरचिटणीस सामान्य प्रशासन प्रमोद मोरे यांच्यासह प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी व सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.सदर निवडीबाबत जलील पटेल यांचे आमदार शिरीषदादा चौधरी,काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार,जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे,जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी,जमील शेख,जिल्हा महानगर अध्यक्ष शाम तायडे यांच्यासह काँग्रेस प्रदेश जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.