Just another WordPress site

“मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका”-वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा अप्रत्यक्ष इशारा

अकोला-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१७ फेब्रुवारी २४ शनिवार

कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांना वेगळे मराठा आरक्षण देऊ अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे परंतु मनोज जरांगे नोंदी असलेल्यांना आणि शपथपत्रासह सगेसोयऱ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्याच्या मगणीवर ठाम आहेत त्यामुळेच ते पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत परंतु जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळू लागली आहे.दोन दिवसांपूर्वी त्यांच्या नाकातून रक्त येत होते तसेच त्यांना पोटदुखीचा त्रास होत होता व त्यांना बसून नीट बोलता येत नसून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचे एक पथक उपोषणस्थळी उपस्थित आहे परंतु जरांगे पाटील उपचार घेण्यासही तयार नाहीत.आंदोलकांच्या आग्रहानंतर त्यांनी सलाईन लावून घेतली आहे.अशातच मनोज जरांगे यांच्या जीवाला धोका असल्याचा अप्रत्यक्ष इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.प्रकाश आंबेडकर यांनी काही वेळापूर्वी अकोला येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी ते म्हणाले,मनोज जरांगे यांचे आंदोलन ज्या पद्धतीने चालू आहे त्या आंदोलनामुळे अनेकजणांना धक्का लागण्याची शक्यता आहे त्या धक्यामुळे बरेचजण धास्तावले आहेत.निजामी मराठ्यांच्या राजकारण विरोधात जरांगे पाटील यांनी अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे हे स्पष्ट झाले आहे त्यांमुळे त्यांना जी औषधी दिली जात आहेत,जी सलाईन, जेवण आणि ज्युस (फळांचा रस) दिला जात आहे या सगळ्या गोष्टी तपासायला हव्यात त्यानंतरच त्यांनी त्याचे सेवन करावे.शासन ही व्यवस्था करेल अशी अपेक्षा मी बाळगतो असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे यांच्या जीवाला धोका आहे का? या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की,मनोज जरांगे ज्या पद्धतीने राजकारण बदलू पाहत आहेत व त्यांचे आंदोलन असेच चालू राहिले तर अनेक जणांचे खेळ संपणार आहेत,सत्ता जाणार आहे.लोकांच्या संपत्तीवर टाच येऊ शकते. राजकारणात काहीही होऊ शकते.मनोज जरांगे यांना असलेला धोका लक्षात घेता मी शासनाला विनंती करतो की तुम्ही मनोज जरांगे यांच्यासाठी जे डॉक्टर्स नेमले आहेत,त्या डॉक्टरांना सक्त ताकीद दिली पाहिजे की तपासल्याशिवाय,बघितल्याशिवाय जरांगेंच्या गोष्टींमध्ये कोणालाही हस्तक्षेप करू देऊ नका.तसेच आगामी काळात राजकारणाात भयंकर मोठी उलथापालथ होणार आहे तरीही आपल्याला सरकारी डॉक्टरांवर विश्वास ठेवावा लागेल.मी जरांगेंना सल्ला देईन की ते जी औषध,साईन,ज्युस किंवा जेवण घेत आहेत त्या गोष्टी जवळच्या व्यक्तीला तपासायला लावा.जेवण हे ओळखीच्या माणसाने दिलेले असले पाहिजे तसेच ज्या दुकानातून साहित्य आणले जातय तो दुकानदार ओळखीचा असायला हवा.जेवण तुमच्या घरातून आले असेल तर उत्तम.मनोज जरांगे यांनी निजामी मराठ्यांच्या राजकारणाला आव्हान दिले आहे त्यामुळे त्यांनी आता सावध असले पाहिजे असे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.