Just another WordPress site

“काही कुठे येणार नाही आणि जाणार नाही”-भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर जयंत पाटील यांनी सोडले मौन

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१९ फेब्रुवारी २४ सोमवार

आज सकाळ पासूनच पश्चिम महाराष्ट्रातला एक बडा नेता भाजपात जाणार अशी चर्चा रंगली असून भाजपा शरद पवार गटाला आणखी एक धक्का देणार असेही बोलले जात आहे तसेच हे नाव दुसऱ्या तिसऱ्या कुणाचे नसून जयंत पाटील यांचे आहे.जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा आज सकाळपासून रंगली आहे.या सगळ्या चर्चांवर दस्तुरखुद्द जयंत पाटील यांनी मौन सोडले आहे.लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते अशी स्थिती आहे.या निवडणुकीच्या तोंडावर देशपातळीवर भाजपात आणि एनडीएत इनकमिंग वाढले आहे तर महाराष्ट्रात महायुतीमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर येत आहेत.काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला.मिलिंद देवरा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले तर बाबा सिद्दीकी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर गेले.काँग्रेसचे दिग्गज समजले जाणारे हे नेते महायुतीत गेले. आता आज सकाळपासूनच जयंत पाटील भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही वक्तव्य केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाची गॅरंटी दिली आहे.मोदींची गॅरंटी आणि आत्मनिर्भर भारत संकल्पाला साथ देण्यासाठी अनेक लोक आमच्याकडे येण्याची तयारी करत आहेत.काहीजण तयारीत आहेत परंतु तुम्हा पत्रकारांकडे असलेली माहिती माझ्याकडे नाही परंतु कधीही काहीही होऊ शकते.मोदींना साथ देण्यासाठी कोणीही आमच्याकडे येऊ शकते असे बावनकुळे यांनी नमूद केले आहे.

जयंत पाटील आणि माझी कुठेही,कसलीही चर्चा झालेली नाही त्यांनी आमच्या पक्षात येण्यासाठी संपर्क केलेला नाही किंवा त्यांचे माझ्याशी काही बोलणे झालेले नाही.या कदाचित कपोकल्पित बातम्या असतील.तरीही पंतप्रधान मोदींना साथ देण्यासाठी आमच्याकडे कोणीही येऊ शकते असेही बावनकुळे म्हणाले.यानंतर आता जयंत पाटील यांनीच भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर मौन सोडले आहे.”काही कुठे येणार नाही आणि जाणार नाही,माझ्या नावाची चर्चा असेल तर चांगलेच आहे.प्रसिद्धी मिळाली की लोकांसमोर जाता येते आपण यावर नंतर बोलू.” असे म्हणत जयंत पाटील यांनी या सगळ्या गोष्टींवर मौन सोडले आहे.टीव्ही ९ मराठीशी बोलतांना त्यांनी अवघ्या तीन ओळींत ही प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात जेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिली तेव्हा जयंत पाटील रडले होते.शरद पवारांचे अत्यंत निष्ठावान आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांचा विषय त्यांनी अवघ्या तीन ओळींमध्ये संपवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.