Just another WordPress site

विजेच्या खांबावर शॉक लागल्याने तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-जळगाव तालुक्यातील मोहाडी गावात विजेच्या खांबावरील लाईट दुरुस्त करण्यासाठी खांबावर चढलेला तरुणाचा विजेचा धक्का लागून तो खाली कोसळल्याने जखमी झाल्याची घटना मंगळवार दि.४ रोजी घडली होती.या जखमी तरुणाचा मंगळवारी दुपारी ३ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.चंद्रकांत दत्तात्रय ठाकरे (वय-२३ वर्षे,रा. मोहाडी) असे मयत तरुणाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की,चंद्रकांत ठाकरे हा तरूण आपल्या कुटुंबियांसह जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे वास्तव्यास होता.चंद्रकांत  ठाकरे हा मोहाडी ग्रामपंचायत कार्यालयात पाणी पुरवठा विभागात नोकरीला होता.२७ सप्टेंबर २२ रोजी सायंकाळी सात वाजता गावातील विजेचा खांब्यावरील लाईट बंद असल्याने चंद्रकांत खांब्यावर चढला.बंद लाईट दुरुस्त करत असताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसून खाली कोसळल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली.त्यावेळी त्याला जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.मात्र आज मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली व त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.