Just another WordPress site

“उद्धव ठाकरेंना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह परत मिळेल ? असीम सरोदे यांचा दावा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२० फेब्रुवारी २४ मंगळवार

राहुल नार्वेकरांनी शिवसेनेबाबत आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत जो निर्णय दिला तो चुकीचा असून आम्हाला सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल आणि उद्धव ठाकरेंना शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे चिन्ह परत मिळेल असा दावा असीम सरोदे यांनी केला आहे.तसेच मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्या डोळ्यांत धूळफेक केली गेली आहे असेही असीम सरोदे यांनी म्हटले आहे.शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना देऊन राहुल नार्वेकरांनी खूप मोठी चूक केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा तो अपमान आहे.सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला त्यात दोन गोष्टी होत्या.भरत गोगावलेंना व्हिप म्हणून मान्यता देणे बेकायदेशीर आहे असे म्हटले होते तसेच एकनाथ शिंदेंना गटनेता म्हणून मान्यता देणेही बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते.सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे १० व्या सूचीनुसार पक्षांतर बंदीचे प्रकरण असल्याने राहुल नार्वेकरांनी शेवटचा निकाल द्यावा म्हणून त्यांच्याकडे पाठवण्यात आले होते.सरन्यायाधीशांसह पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे म्हटले होते की,अध्यक्षांनी निर्णय द्यायचा आहे कारण हे पक्षांतर बंदी कायद्याचे प्रकरण आहे मात्र राहुल नार्वेकर म्हणतात हे पक्षांतर बंदी कायद्याचे नाही त्यामुळे कुणीच अपात्र नाही हा निर्णय पूर्णतः चुकीचा आहे.दिशाभूल करणारा आणि बेकायदेशीर आहे असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

राहुल नार्वेकरांना एक प्रश्न विचारला पाहिजे की,हे प्रकरण पक्षांतर बंदी कायद्याचे नव्हते तर मग त्यांना निर्णय देण्याचा कुठलाच अधिकार राहात नाही त्यांनी एक ओळ लिहून सर्वोच्च न्यायालयाला सांगायला हवे होते की हे प्रकरण पक्षांतर बंदी कायद्याचे नाही त्यामुळे मी ठरवू शकत नाही.संपूर्ण निर्णय त्यांना घ्यायचाच अधिकार नाही जसा निर्णय त्यांनी शिवसेनेच्याबाबतीत दिला तसाच राष्ट्रवादीबाबतही दिला आहे जो बेकायदेशीर आहे तसेच उद्धव ठाकरेंना राजकीय पक्षाचा व्हिपही मिळेल,राजकीय पक्षाचे नावही मिळेल आणि धनुष्यबाण हे चिन्हही मिळेल. सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्याला अनुसरुनच आता पुढचा निर्णय घेतला जाईल.एकनाथ शिंदे औट घटकेचे राजे आहेत असे समजू शकतो असे सरोदे यांनी म्हटले आहे.त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांची दिशाभूल करण्यात आली आहे.मराठा आरक्षणाचा विषय पुढे करुन त्यांचा वापर होतो आहे असे मला वाटते.सगे-सोयरे ही व्याख्या कायद्यात घ्यायची असेल तर एखादे सर्क्युलर काढून बदल होत नाही. कायद्यात बदल करावे लागतील.जरांगे पाटील यांनी मागणी केली पाहिजे की केंद्र सरकारने हा घटनात्मक बदल करावा आणि त्यांना नरेंद्र मोदींनी येऊन भेटले पाहिजे असा आग्रह त्यांनी ठेवण्याची गरज आहे.अधिवेशनाच्या नावाखाली धूळफेक केली जाते आहे असेही असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.