यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२० फेब्रुवारी २४ मंगळवार
तालुक्यातील येथील ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग अॅण्ड प्रक्रीया सहकारी संस्था मर्या.फैजपुर पंचवार्षीक संचालक मंडळ निवडणुक सन २०२३ ते २०२८ या कालावधी करीता संपन्न झाली असुन यात ११ पैकी ९ उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत.
सदर निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवाराची नावे पुढील प्रमाणे आहेत.यात चौधरी रमेश मोतीराम सर्वसाधारण मु.पो जळगाव,कोलते रविंद्र घनःशाम (पत्रकार) सर्वसाधारण मु .पो.न्हावी ता यावल,पिंपळे भास्कर देविदास सर्वसाधारण,मु.पो.भालोद ता यावल,चौधरी विलास सदाशिव सर्वसाधारण,मु.पो.वनोली ता.यावल,पाटील अमोल गणेश सर्वसाधारण मु.पो.केन्हाळा ता.रावेर,महिला राखीव बोंडे ज्योती प्रल्हाद मु.पो.निभोरा ता.रावेर,चौधरी हेमलता प्रल्हाद मु.पो.कोळवद ता.यावल,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पाटील हर्षल गोविंदा इतर मागासवर्गीय,मु.पो. सातोद ता.यावल,धनके विलास पुना,मु.पो.रसलपुर ता.रावेर बिनविरोध निवडून आले आहेत.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी.जे.तडवी यांनी काम पाहिले.सदरहू संपूर्ण निवडणुक प्रक्रीया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.नवनिर्वाचित सदस्यांचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे,भाजपाचे जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी,शरद महाजन व तालुका अध्यक्ष उमेश फेगडे आदिनी स्वागत केले आहे.