दसऱ्याच्या दिवशीच का साजरा करतात धम्मचक्र प्रवर्तन दिन?
जाणून घ्या बौध्द धर्मात काय आहे या दिवसाला विशेष महत्व?
बाळासाहेब आढाळे
मुख्य संपादक पोलीस नायक
Recover your password.
A password will be e-mailed to you.
बाळासाहेब आढाळे
मुख्य संपादक पोलीस नायक
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी भारताचे पहिले कायदा मंत्री आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भीमराव रामजी आंबेडकर(बाबासाहेबआंबेडकर)यांनी त्यांच्या ३ लाखांहून अधिक अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला.याच दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माची दिक्षा घेतली म्हणून या दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन दिन असे म्हणतात.धर्मांतर १४ ऑक्टोबर रोजी झाले असले तरी धम्मचक्र प्रवर्तन दिन ज्या दिवशी कार्यक्रम चिन्हांकित करतो त्या दसऱ्याच्या दिवशी साजरा केला जातो.यंदा धम्मचक्र प्रवर्तन दिन ५ ऑक्टोबर २२ रोजी मोठ्या धुमधडाक्यात व उत्साहात साजरा केला जात आहे.लाखो बौद्ध अनुयायांनी या दीक्षाभूमीवर हजेरी लावली आहे.लाखो अनुयायांनी यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत नतमस्तक होत वंदन केले.आज रात्रीपर्यंत अजून देशभरातील लाखो अनुयायी धम्माची दिक्ष घेतील तसेच दिक्षभूमीस वंदन करतील.धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरातील दीक्षाभूमी एक भव्य दिव्य सोहळा साजरा केला जातो कारण याच ठिकाणी डॉ.आंबेडकरांसह त्यांच्या लाखो अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.लोकांचे बौद्ध धर्मात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन साजरे करण्यासाठी अनेक बौद्ध या ठिकाणी एकत्र येवून हा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा उत्सव साजरा करतात.
डॉ.आंबेडकरांचा जन्म हिंदू धर्मात झाला होता.परंतु त्याकाळात त्यांना शूद्र अतिशूद्र व स्पृश्य-अस्पृश्य भेदभावाचे चटके मोठ्या प्रमाणावर सोसावे लागले होते व किडस आणणारी वागणूक त्यांना देण्यात आली.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध धर्मांचा अभ्यास केला अखेरीस त्यांना बौध्द धर्माची शिकवण व बौद्ध धर्माचे तत्वज्ञान आवडले व त्यानुसार त्यांनी जातीयवादीव्यवस्थेला कंटाळून बौध्द धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला.कदाचित जातीय वर्णव्यवस्थेचे चटके त्यांना खायला मिळाले नसते तर बाबासाहेबांना हिंदू धर्म बदलून बौद्ध धर्म स्वीकारावा लागला नसता.जातीय धर्मांधांनी त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडले.त्यांनी नैतिकतेच्या दृष्टीकोनातून या धर्माची निवड केली असल्याचे सांगीतल्या जाते.डॉं बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माची दिक्षा घेतली म्हणून नागपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो.नागपूरची अवघी दीक्षाभूमी पंचशील ध्वजांनी नाहून निघाल्याचे आता पाहायला मिळत आहे.गेले दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभुमिवर धम्मचक्र दिन धुमधडाक्यात साजरा करण्यात आला नसल्याने यावर्षी हा उत्सव दणक्यात साजरा केला जात आहे.देशभरातील सर्वच राज्यातून बौद्ध अनुयायी येणार आहेत.त्यामुळे लाखो अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिनाला हजेरी लावतील असा दावाही समितीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आज नागपूरच्या दिक्षाभूमीवर लाखोंचा भीमसागर उसळण्याल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमास हजेरी लावणार आहे.
Watch Related Videos
Recover your password.
A password will be e-mailed to you.