मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ फेब्रुवारी २४ बुधवार
भारतीय जनता पक्ष हा फसवाफसवीच्या पायावर उभा असून मराठा आरक्षणापासून ते चंदीगड महापौर पदापर्यंत सगळी फसवाफसवी सुरु आहे.१० टक्के आरक्षणाचा सरकारने जो फसवणुकीचा प्रकार केला तो मराठा समाजाला मान्य नाही असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. कायदा,सुव्यवस्था यांची स्थिती निर्माण झाली तर सरकार गिरीश महाजन आणि इतर मंत्र्यांप्रमाणे सरकार नाचणार आहेत का? छत्रपती शिवराय यांची एकनाथ शिंदेंनी घेतलेली शपथ खोटी आहे यांनी आत्तापर्यंत बाळासाहेबांच्या खोट्या शपथा घेतल्या आहेत त्यांच्या समाधीसमोर उभे राहून आणि खुर्चीसमोर उभे राहून शिवसेना सोडणार नाही अशा शपथा घेतलेले हे लोक आहेत यांच्या शपथांवर काय विश्वास ठेवता ? असाही टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे हे मराठवाड्याचा दौरा करणार आहेत व कष्टकऱ्यांची भेट घेणार आहेत असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.मराठा आरक्षणाच्या नावाखाली या सरकारने फसवणूक केली आहे त्यामुळेच आज मनोज जरांगे पाटील हे त्यांची भूमिका मांडणार आहेत तसेच इंडिया आघाडीत मतभेद नाहीत.राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात यायच्या आधी आमचे जागावाटप झालेले असेल.आमच्या चर्चा व्यवस्थित सुरु आहेत असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.