आयटी,ईडी,सिबीआय भाजपाचे तीन जावई – उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव
बिहार विधानसभेत तेजस्वी यादव यांचा भाजपा वर हल्लाबोल
बिहार – वृत्तसंस्था :-लालुप्रसाद यादव यांनी घाट्यात चालणारी रेल्वे नफ्यात आणली व ९० हजार करोड चा फायदा करून दिला यावेळी युनिव्हर्सिटी च्या छात्रांनी लालुप्रसाद यांना गुरु मानले.परंतु आज आपल्या देशात काय होत आहे व जनतेला काय न्याय दिला जात आहे तर जो घाट्यात चालणाऱ्या रेल्वेला फायद्यात आणून देतो त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात व जो रेल्वेला तसेच देशातील संपत्तीला विकून टाकील त्यांच्यावर काहीच होत नाही हे तेजस्वी यादव यांनी विधानसभेत सांगितले त्यावेळी विधानसभेत हशा पिकला.आम्ही विदेशात हनिमूनला जातो त्यावेळी आमच्यावर लुकआऊट नोटीस लावली जाते परंतु ललित मोदी,निरव मोदी,विजय माल्या,महुल चोक्सी हे लाखो हजार कोटी रुपये घेऊन पळाले त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.देशभरातील सर्व संपत्ती व जमीन भारतातील तमाम जनतेला बरोबरीने वाटून मोकळे व्हा म्हणजे तेव्हाच दुधाचे दुध व पाण्याचे पाणी होईल असा सल्लाही तेजस्वी यादव यांनी केंद्रसरकारला दिला.
दहा हजार करोड कर्ज असणाऱ्या कर्जधारकांना कर्ज माफ केले जाते व देशातील आम गरीब जनतेवर ५ टक्के जीएसटी वाढवुन शेतकऱ्यांवर व जनतेवर अन्याय केला जातो हि कसली विचारसरणी .याबाबतचा विचार होण्याची आज गरज असल्याचे तेजस्वी यांनी यावेळी नमूद केले. यादव तसेच भाजपा ज्यावेळी घाबरते त्यावेळी आयटी,सीबीआय,ईडी चा वापर करून त्याचा अतिरेक केला जात आहे.आयटी,सीबीआय,ईडी हे भाजपाचे तीन जावई असल्याबाबतचा आरोप करून तेजस्वी यादव यांनी केंद्रसरकारवर हल्लाबोल केला.तेजस्वी यादव २४ ऑगस्ट २२ रोजी विधानसभेत झालेल्या भाषणात बोलत होते.