Just another WordPress site

यावल नगरपालिका व पंचायत समितीमध्ये रॅम्प बसविण्याबाबत दिव्यांग बांधवांची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२१ फेब्रुवारी २४ बुधवार

येथील पंचायत समिती व नगर परिषदमध्ये रॅम्प बसविण्यासह विविध मागण्यांचे निवेदन प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने नुकतेच देण्यात आले.

सदर निवेदनात पंचायत समितीमध्ये व नगरपालिकामध्ये रॅम बसवणे,नगरपालिका तसेच ग्रामीण भागातील ग्रामपंचायतमध्ये ५० टक्के घरपट्टीमध्ये सवलत देण्यात यावी तसेच दिव्यांगांसाठी दिव्यांग हॉल व गार्डनची निर्मिती करण्यात यावी अशा आशयाच्या मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले आहे.प्रसंगी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष प्रवीण सोनवणे,तालुका उपाध्यक्ष जनार्दन फेगडे,मिथुन सावखेडकर,दिलीप चौधरी,दिलीप आमोदकर,उत्तम कानडे,प्रदीप माळी,शशिकांत वारुडकर,महिला आघाडी अध्यक्ष खुशबू चौधरी,उपाध्यक्ष सरला तायडे,मंगला बारी,गीतांजली वरुडकर तसेच दिव्यांग बांधव असीम शेख,शब्बीर खान रफिक,भगवान माळी,किरण सुरवाडे,दिनकर चौधरी,नलनी चौधरी,सिकंदर पटेल,शेख अस्लम शेख हमीद,चंद्रकांत बावस्कर,शाहरुख पटेल,शेख इस्माईल,शेख वजीर,फिरोज पटेल यांच्यासह दिव्यांग बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.