जागतिक महिला दिनानिमित्त श्रीराम दादा पाटील मित्र परिवारातर्फे २२ ते २४ फेब्रुवारी दरम्यान हळदी कुंकू समारंभाचे आयोजन
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ फेब्रुवारी २४ बुधवार
जागतिक महिला दिनानिमित्त श्रीराम दादा पाटील मित्र परिवारातर्फे रावेर,यावल व फैजपुरमध्ये दि.२२ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी २४ या कालावधीत महिलांसाठी विविध ठिकाणी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त ‘चला करूया सन्मान नारीशक्तीचा सोहळा आनंदाचा’ उपक्रमाद्वारे तसेच श्रीराम दादा पाटील मित्र परिवाराच्या वतीने रावेर,यावल व फैजपुरमध्ये महिलांसाठी लोकप्रिय व गाजत असलेला महिला भगिनींचा आवडता कार्यक्रम तसेच कधी न झालेला खेळ पैठणीचा व सोबत खेळा व जिंका लाखोंचे बक्षिसे अशा विविधांगी हळद कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमाला क्रांतीनाना मळेगांवकर (सिनेअभिनेता) तसेच कु.सह्याद्री मळेगांवकर (बालगायिका व टीव्ही स्टार) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.सदरील कार्यक्रम दि.२२ फेब्रुवारी २४ गुरुवार रोजी संध्याकाळी ६ वाजता छोरिया मार्केट शेजारी,हेमंत नाईक यांचा प्लॉट रावेर,दि.२३ फेब्रुवारी २४ शुक्रवार रोजी संध्याकाळी ६ वाजता खंडोबा वाडी देवस्थान,फैजपूर तसेच दि.२४ फेब्रुवारी २४ शनिवार रोजी संध्याकाळी ६ वाजता धनश्री चित्र मंदिर टॉकीजच्या मागील बाजूला यावल येथे आयोजित करण्यात आलेले आहेत.तरी परिसरातील महिलांनी या कार्यक्रमात उपस्थिती देऊन एक दिवस आनंदमय वातावरणात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक श्रीराम दादा पाटील मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.