Just another WordPress site

“सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे,त्या शिवाय सरकारला सुट्टी देणार नाही”-मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

आंतरवली सराटी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२१ फेब्रुवारी २४ बुधवार

सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे.दोन दिवसात अंमलबजावणी करा.आमच्या व्याख्येनुसारच अंमलबजावणी करा.महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण दिले आहे मात्र हे आरक्षण आम्हाला मान्य नाही.सरकारने मोटरसायकल दिली आणि पेट्रोल काढून घेतल्याचा प्रकार आहे असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.कोट्यवधी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे हीच त्यांची मागणी आहे.कोकणात पुरावे सापडत नव्हते म्हणून कुणबी आणि मराठा एकच आहे हे ते म्हणत होते.कुणबी नकोय ते आमच्यावर रुसायला लागलेत,जे रूसत होते, कुणबी नको म्हणून त्यांना मंगळवारी कुणबी आरक्षण मिळाले आता विरोध करणारे कोणी राहिले नाही मग आता सरसकट करायला काय हरकत आहे? सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे त्या शिवाय सरकारला सुट्टी देणार नाही.कुणबी आणि मराठे एकच असल्याचा एकाच ओळींचा कॅबिनेट निर्णय आवश्यक आहे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे यांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीत मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करून सर्व नोंदी सापडून सग्या सोयऱ्यांची अमलबजावणी करा,अंतरवली सह,राज्यातील सर्व गुन्हे विना अट मागे घ्या,हैदराबादचे गॅझेट घ्यायचे आणि ते स्वीकारायचे,१८८१ चे गॅझेट घ्या,१९०१ ची जनगणना घ्यावी,बॉम्बे गॅझेट घ्या या तीन प्रमुख मागण्यांवर एकमत झाले आहे त्यामुळे काही वेळात मनोज जरांगे पत्रकार परिषद घेऊन पुढील मागण्या मांडतील तसेच या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला काही वेळ दिला जाऊ शकतो.जर सरकारने मागण्या मान्य न केल्यास पुढील आंदोलन कसे असणार याबाबत सुद्धा मनोज जरांगे यांच्याकडून घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय अधिवेशनात घेतला मात्र स्वतंत्र आरक्षण देण्याची मोजक्या शंभर दीडशे लोकांची मागणी असून कोट्यवधी मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण हवे असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहेत त्यामुळे सरकराने सगेसोयरे अध्यादेशाप्रमाणे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे असेही जरांगे म्हणाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.