Just another WordPress site

यावल खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी नरेंद्र नारखेडे तर व्हा.चेअरमनपदी तेजस पाटील यांची निवड बिनविरोध

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२२ फेब्रुवारी २४ गुरुवार

येथील तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघाच्या नुतन चेअरमनपदी नरेंद्र विष्णु नारखेडे यांची दुसऱ्यांदा तर व्हाईस चेअरमनपदी तेजस धंनजय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यावल येथे आज दि.२२ फेब्रुवारी गुरूवार रोजी सकाळी ११ वाजता खरेदी विक्री संघाच्या सभागृहात संपन्न झालेली चेअरमन,व्हाईस चेअरमन यांची निवडणुक निवडणुक निर्णय अधिकारी नंदकिशोर मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.सदर बैठकीत यावल खरेदी विक्री शेतकरी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी नरेंद्र विष्णु नारखेडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी तेजस धंनजय पाटील यांचे दोघांचे प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

या बैठकीस नवनिर्वाचीत संचालक नारायण शशीकांत चौधरी,तुषार सांहूसिंग पाटील( मुन्ना ),उमेश रेवा फेगडे,पांडूरंग सराफ,डॉ.नरेन्द्र कोल्हे, अतुल भालेराव,सूनिल नेवे,आरती शरद महाजन,सागर महाजन,प्रविण वारके,धंनजय फिरके,नयना चंद्रशेखर चौधरी,प्रशांत लिलाधर चौधरी, हेमराज जगन्नाथ फेगडे असे सर्व संचालक या बैठकीस उपस्थितीत होते.यावेळी नवनियुक्त चेअरमन नरेन्द्र नारखेडे,विरोधी गटातील संचालक अतुल पाटील,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हीरालाल चौधरी,शरद महाजन,कृउबाचे सभापती हर्षल गोविंदा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करीत संस्थेबद्दलची सविस्तर माहिती नवनिर्वाचीत संचालकांना दिली.दरम्यान चेअरमन आणी व्हाईस चेअरमन यांच्या निवडणुक प्रक्रीयेत निवडणुक निर्णय अधिकारी नंदकिशोर मोरे यांना खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक शशिकांत गाजरे यांनी विशेष सहकार्य केले.यावेळी निवड झालेल्या चेअरमन आणी व्हाईस चेअरमन यांचे स्वागत सत्कार कार्यक्रमाप्रसंगी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे,कृउबाचे संचालक राकेश फेगडे,कृउबाचे संचालक उज्जैनसिंग राजपुत,भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी,दहिगावचे उपसरपंच देविदास धांगो पाटील यांच्यासह पक्षाचे अन्य पदधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.