Just another WordPress site

न्हावी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी व सरपंच तसेच सदस्यांचा मनमानी कारभार

दलित वस्ती निधीच्या गैरवापराची चौकशी करण्याची भिम आर्मी भारत एकता मिशन तर्फे मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२३ फेब्रुवारी २४ शुक्रवार

तालुक्यातील न्हावी ग्रामपंचायतचे कारभारी व प्रशासकीय अधिकारी यांच्या दुर्लक्षित व मनमानी कारभाराने कळस गाठला असुन शासनाच्या वतीने दलीत वस्तीसाठी आलेला विकास निधी दुसरीकडे वळविण्यात आला असुन या सर्व प्रकारच्या कामांची प्रांत अधिकारी यांनी तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.तसेच सदरची कारवाई ही सात दिवसाच्या आत न झाल्यास भिम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संस्थेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.

या संदर्भात भिम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संस्थेच्या वतीने फैजपुर येथे प्रांतधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मौजे न्हावी प्र.यावल या ग्रामपंचायतचे सरपंच,ग्रामविकास अधिकारी,ग्राम पंचायत सदस्य यांनी आपला मनमानी कारभार चालवीत दलीत वस्तीचा निधी गावातील ईतर वस्तीमध्ये वापरून सदर निधीचा निळकंठ भंगाळे यांच्या गोडावुनपासुन तर सुभाष भंगाळे यांच्या बखळ प्लाटपर्यंत काँक्रीटीकरण केले आहे.सदरहू ग्राम पंचायतच्या कारभाऱ्यांनी मनमानी करीत शासनाच्या निधीचा गैरवापर केला असुन यासर्व प्रकाराची तात्काळ चौकशी करून शासनाच्या निधीचा अशा प्रकारे गैरवापर करीत शासनाची फसवणुक करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.दरम्यान ग्रामपंचायतमध्ये महिला सदस्य निवडून आलेल्या असुन सदर महिला ग्रामपंचायतमध्ये उपस्थित नसतात व त्यांच्या ठिकाणी त्यांचे पती उपस्थित राहुन ग्रामपंचायतीच्या अशा प्रकारे होणाऱ्या गैरकारभारात ग्रामविकास अधिकारी यांच्या सोबत सहभागी होवुन प्रशासकीय कामात ढवळाढवळ करतात सदरहू यांच्यावर देखील कायद्याशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली असुन सात दिवसाच्या आत ही कार्यवाही न झाल्यास भिम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीते प्रांत अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा ईशारा संस्थेचे जिल्हा सह संघटन हेमराज अशोक तायडे यांनी दिले असुन यावेळी संस्थेचे मिलींद तायडे,स्वप्नील तायडे,अमोल तायडे,रोशन मोरे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.