निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला तुतारी दिली असून संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे.तुमच्या संघर्षातून,त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे.या ऐतिसाहिक भूमीत आपण आलोय.या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करुया असे आवाहन शरद पवारांनी केले. तुतारी हे राज्याचे ऐतिहासिक वाद्य असून त्यामुळे पक्षाला ऐतिहासिक चिन्ह मिळाले असल्याचा दावा सातत्याने केला जातोय.यानिमित्ताने या पक्षाच्या चिन्हाचे अनावरण आज रायगड किल्ल्यावर करण्यात आले.वयोमानानुसार शरद पवारांना रायगड किल्ला सर करणे अवघड होते परंतु रोपवे आणि पालखीमुळे त्यांना रायगड किल्ल्यावरचा प्रवास सुकर झाला.आधी ते रोप वेने रायगडावर पोहोचले तर नंतर त्यांनी पालखीचा आधार घेतला.जवळपास ४० वर्षांनंतर ते किल्ले रायगडावर आज आले आहेत.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ फेब्रुवारी २४ शनिवार
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह दिले असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हे चिन्ह वापरता येणार आहे.त्याआधी या चिन्हाच्या अनावरण सोहळ्यासाठी शरद पवार गटाकडून मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.यानिमित्ताने ऐतिहासिक असलेल्या या चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावर करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमित जाऊन शरद पवारांच्या हस्ते या चिन्हाचे अनावरण करण्यात आले आहे.दरम्यान यानंतर शरद पवारांनी जनतेशी संवाद साधतांना तुतारी जनतेला प्रेरणा देईल असा विश्वास व्यक्त केला आहे.सध्याचा संघर्ष हा वैचारिक असून या देशात अनेक राजे झाले,संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा एकच झाला.सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे.शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते.आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा याठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील असे शरद पवार म्हणाले.