Just another WordPress site

“…आमच्यासारख्या तिकडे गेलेल्या लोकांनी ठरवले तर एका रात्रीत भाजपा संपून जाईल”

'गाव तसेच शहरातील छोटे पक्ष संपवा' चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरून संजय राऊत यांची टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२५ फेब्रुवारी २४ रविवार

गेल्या काही महिन्यांपासून देशभरातील अनेक मोठ्या पक्षांमधील नेते भाजपात प्रवेश करत असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही लहान-मोठे पक्ष भाजपाशी युती करत आहेत.विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे भाजपमध्ये इन्कमिंग चालू असतानाच महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा नेते आणि पदाधिकाऱ्यांना मोठे आवाहन केले आहे.“आपआपल्या जिल्ह्यातील छोट्या पक्षातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांना भाजपामध्ये घ्या आणि गाव तसेच शहरातील छोटे पक्ष संपवा” असे थेट आवाहन बावनकुळे यांनी केले आहे.यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.संजय राऊत म्हणाले,भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागत आहेत.अनेक लहान-लहान प्रादेशिक पक्षांना बरोबर घेऊन एनडीएची उभारणी करावी लागत आहे.तुम्ही कितीही म्हणालात,याला संपवू.. त्याला संपवू..तरी ते शक्य नाही कारण सध्या तरी या देशात लोकशाही आहे.चंद्रशेखर बावनकुळेंनी काहीही सांगू देत २०२४ नंतर तुमचा पक्ष राहतोय का बघा…तुमचा पक्ष भाजपा राहिलेला नसून काँग्रेसमय झाला आहे.त्या पक्षात आलेल्या काँग्रेसवाल्यांनी किंवा आमच्यासारख्या तिकडे गेलेल्या लोकांनी ठरवले तर एका रात्रीत भाजपा संपून जाईल त्यांनी ठरवले भाजपा सोडायची तर तुमच्या पक्षाचे अस्तित्व संपेल.तुमच्या ३०३ खासदारांपैकी ११० खासदार मूळ भाजपाचे आहेत बाकी सर्वजण काँग्रेस आणि इतर पक्षातून आलेले आहेत.या सर्व नेत्यांनी आणि खासदारांनी ठरवले की आता भाजपा सोडायची तर हा देश भाजपामुक्त होईल हे बहुदा बावनकुळेंना माहिती नसावे.

भाजपावाल्यांना त्यांचा पक्ष टिकवण्यासाठी शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातल्या प्रमुख लोकांची गरज भासते मग तुम्ही इतकी वर्षे काय #### बसला होता? ही तुमची ताकद परावलंबी आहे.लहान पक्ष संपवू,ही तुमची भूमिका हुकूमशाहीला पुढे नेणारी आहे.देशातून लोकशाही संपवायची असा त्यांचा प्रयत्न चालू आहे.या देशात हुकूमशाहीविरोधात जे पक्ष उभे राहतील त्यातले लहान पक्ष संपवणे,मोठे पक्ष फोडणे ही या बावनकुळेछाप भाजपा नेत्यांची एक भूमिका आहे,जी महाराष्ट्राला आणि देशाला घातक आहे.ठाकरे गटातील खासदार म्हणाले, या भाजपावाल्यांना देशातून लोकशाही नष्ट करायची आहे,आपले स्वातंत्र्य नष्ट करायचे आहे,लिहण्याचे,बोलण्याचे आणि निवडणुका लढण्याचे  स्वातंत्र्य हिरावून घ्यायचे आहे.बावनकुळे बोलतायत ती त्यांच्या राष्ट्रीय पक्षाची भूमिका आहे.ही माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणींची भूमिका नाही.ही मोदी-शाहांची विचारसरणी आहे.या विचारसरणी विरोधात आम्ही सगळे एकत्र आलो आहोत.२०२४ च्या निवडणुकीत कोण कोणाला संपवतय हे लवकरच समजेल.मैदानात कोण राहतय आणि कोण संपतय,जनता लोकशाही मार्गाने कोणाला गाडतेय ते कळेल परंतु ते चित्र पाहण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळेंनी अस्तित्वात असावे.

Leave A Reply

Your email address will not be published.