मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेनेविरुद्ध मराठी माणसाला लढविण्याचे पाप भाजपच्या कमळाबाईनी केले.पुढील निवडणुकीत कमळाबाईची अशी जिरणार आहे की भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल.पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की भाजप नावाचा एक पक्ष महाराष्ट्रात होता व तो महाराष्ट्राच्या मुळावर आला होता असे म्हणत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला शिवाजी पार्क म्हणजे बाळासाहेबांचे शिवतीर्थ मिळू नये यासाठी मोठी कट कारस्थाने झाली मात्र शेवटी न्यायालयाने न्याय केला.ज्या शिवाजी पार्कवरून शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचे मराठी अस्मितेचे रणशिंग फुंकले व उभा महाराष्ट्र जागा केला त्याचबरोबर एक बलाढय संघटन उभे केले त्या शिवतीर्थावरच शिवसेनेविरुद्ध मराठी माणसाला लढविण्याचे पाप भाजपच्या कमळाबाईनी केले.मात्र आता शिवसेनेच्या पुढील लढयाच्या नव्या पर्वाला सुरुवात पुन्हा एकदा शिवाजी पार्कच्याच या रणमैदानावरून होत आहे ही मोठी योगायोगाची गोष्ट आहे.कारण महाराष्ट्राचे भवितव्य जर कुठे निर्माण झाले असेल तर याच रणमैदानावर संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू झाला व याच मैदानावर पूर्ण झाला.शिवसेनेचे प्रत्येक रणशिंग बाळासाहेबांनी याच मैदानावर फुंकले.आता शिवसेनेच्या नव्या लढयाची नांदी याच ठिकाणी होत आहे.आज शिवतीर्थावर विचारांचे सीमोल्लंघन होईल असे शिवसेनेने म्हटले आहे.
कोणी कितीही अपशकुन करू द्या.महाराष्ट्रात शिवसेनेचाच भगवा फडकत राहील आज मुंबईवर शिवसेनेचे राज्य आहे.तुमच्या छाताडावर बसून पुन्हा मुंबई जिंकूच.पुढील निवडणुकीत कमळाबाईची अशी जिरणार आहे की भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल. पुढच्या पिढीला कळणार देखील नाही की भाजप नावाचा एक पक्ष महाराष्ट्रात होता व तो महाराष्ट्राच्या मुळावर आला होता.महाराष्ट्राच्या कानाकोपन्यातून सच्चा शिवसैनिक चालत,धावत व मिळेल त्या वाहनाने शिवतीर्थाकडे निघाला आहे.रणमैदान सज्ज होत आहे.खोके वाल्याचा अथर्म या निष्ठपुढे कसा टिकेल?जेथे धर्म तेथे जया शिवतीर्थाच्या रणमैदानावर धर्म आहे!त्यामुळे जय नक्की आहे!असे म्हणत शिवसेनेने भाजपला सामनाच्या अग्रलेखातून एकप्रकारे इशाराच दिला आहे.