यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ फेब्रुवारी २४ रविवार
येथील आसाराम नगर भागातील रहिवासी राजेंद्र भास्कर अडकमोल वय ५६ वर्ष यांचे आज दि.२५ फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी नऊ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.दरम्यान उद्या दि.२६ फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी १०.३० वाजता त्यांचे राहते घरून राजेंद्र अडकमोल यांची अंत्ययात्रा निघणार आहे.राजेंद्र अडकमोल यांचे निधनाबद्दल परिसरात व नातेवाइकांमध्ये एकच शोककळा पसरली असून त्यांचे निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
राजेंद्र अडकमोल यांचे पश्चात आई,मुलगा,मुलगी,जावई,नातवंडे,भाऊ असा परिवार आहे.राजेंद्र अडकमोल हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सारंग भास्कर अडकमोल यांचे बंधू होत.