“जे काही रविवारी सरकारने केले ते काही चांगले नाही ; मी राज्य बेचिराख होण्यापासून वाचवले आहे”-मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
आंतरवली सराटी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ फेब्रुवारी २४ मंगळवार
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला असून जे काही रविवारी सरकारने केले ते काही चांगले नाही.मी राज्य बेचिराख होण्यापासून वाचवले आहे असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगेंनी गंभीर आरोप केले आहेत.पोलिसांनी जर लाठीचार्ज केला असता तर त्याला प्रत्युत्तर म्हणून संपूर्ण राज्य पेटले असते.डोके ठिकाणावर ठेवून आणि विचार करुन बोला असे मनोज जरांगेंनी म्हटले आहे.देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री आहात.विचार करुन बघा काल काय झाले असते ? तुम्ही बंगल्यात लपून बसला असता पण राज्य जळाले असते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचा विचार करणे आवश्यक आहे.राज्यातल्या सगळ्या नागरिकांनीही विचार केला पाहिजे असेही मनोज जरांगे म्हणाले.काल मनोज जरांगे यांनी त्यांचे बेमुदत उपोषण मागे घेतले असून त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असतांना पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत.
मी प्रामाणिकपणे सांगतो आहे की काहीही गैरप्रकार घडू नये ही देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी होती मात्र ती जबाबदारी मी पार पाडली.पाच हजार महिला या ठिकाणी होत्या तर २० हजार लोक होते.देवेंद्र फडणवीस यांना रात्रीच काहीतरी घडवून आणायचे होते. लोक सैरावैरा रानात पळाले असते.देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा आंतरवली सराटीसारखा लाठीचार्ज घडवून आणायचा होता.मी राज्य बेचिराख होण्यापासून वाचवले आहे.पहिला हल्लाही देवेंद्र फडणवीस यांनीच घडवून आणला होता.इथे आज सकाळी किंवा रात्रीसुद्धा लाठीचार्ज झाला असता तर सर्व मराठा समाज पेटून उठला असता.पुन्हा एकदा राज्य बेचिराख होण्यापासून मी वाचवले आहे.पहिल्या लाठीचार्जनंतर जो उद्रेक झाला त्यातल्या केसेस अजूनही मागे घेण्यात आलेल्या नाहीत त्यांना आतापर्यंत वाटले असते की माझी जनता आहे तर त्यांनी केसेस मागे घेतल्या असत्या.त्यांनी पोलीस बाजूला सारावेत.सागरचा दरावाजा उघडावा मी यायला तयार आहे.मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छितो की,मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नका.सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यासाठी तयारीला लागा असेही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.